‘शिवसेना स्वबळावर लढणार आणि सगळे उमेदवार निवडून आणणार’, ‘या’ मंत्र्याचा ‘गौप्यस्फोट’ !

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना स्वबळावर लढणार आणि सगळे उमेदवार निवडून आणणार असं शिवसेनेचे नेते दीवाकर रावते यांनी म्हटलं आहे. सागंलीत आयोजित केलेल्या एका कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेना विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार. आम्ही यावेळी आमचं सामर्थ्य दाखवून देऊ आणि सगळे उमेदवार निवडून आणू असं प्रतिपादन त्यांनी केलं आहे.

मेळाव्यात बोलताना आपल्या कार्यकर्त्यांना खडसावत दीवाकर रावते म्हणाले, “आपण शिवसेना पक्षातील आहोत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपल्याला दक्ष असायला हवं. 11 वाजताच्या मेळाव्याला तुम्ही 12 वाजता उपस्थित राहिलात. मेळाव्याला उशीरा उपस्थित राहून मागे बसणाऱ्या कार्यकर्त्याच्या गळ्यात हार घाला.” असंही ते म्हणाले.

29 सप्टेंबर रोजी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी युतीची घोषणा करण्यात येणार आहे. आगामी विधानसभेच्या जागावाटपात भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. कारण आगामी निवडणुकीत भाजप 162 जागांवर तर शिवसेना 126 जागांवर लढणार आहे अशी माहिती नुकतीच सूत्रांनी दिली होती. इतकेच नाही तर उर्वरीत जागा या मित्रपक्षांसाठी सोडल्या जातील.

शिवसेनेव्यतिरीक्त इतर मित्रपक्ष कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहे असे बोलले जात होते. अशात आता दीवाकर रावते यांनी स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं आहे. पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Visit : policenama.com