Shivsena Bhaskar Jadhav | भाजपने वारंवार महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, शिवसेना नेते भास्कर जाधवांचा गंभीर आरोप

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने (BJP) राज्यात वेगवेगळे विषय उभे करुन दंगल (Riot) घडवण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप शिवसेना (Shivsena) नेते भास्कर जाधव (Shivsena Bhaskar Jadhav) यांनी केला आहे. भाजपने कंगना रणौत (Kangana Ranaut), सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) तर कधी नुपूर शर्मा (Nupur Sharma), काही जणांच्या हाती भोंगा दिला तर काहींकडे हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) दिली. वेगवेगळ्या पद्धतीने माहाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Govt) आणि त्याचे मुख्यमंत्री सर्वजाती धर्मात लाकडे होत होते. यामुळे भाजप अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत होती, असेही भास्कर जाधव (Shivsena Bhaskar Jadhav) म्हणाले.

 

भास्कर जाधव (Shivsena Bhaskar Jadhav) यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरीत त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना जाधव यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भास्कर जाधव म्हणाले, आज मुंबईत सगळीकडे बॅनर्स लागले आहेत. आपले सरकार आले आणि हिंदुंचे सणांवरील विघ्न टळले. बेस्ट बस, बसस्टॉपवर आहे. यंदाचा शिमगा, गुढीपाडवा, ईद हे सगळे सण विनाअडथळा सुरु करण्याचं काम उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला.

 

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर भाजपसोबत नवं सरकार स्थापन केलं. त्यानंतर महाविकास आघाडीने भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला जात आहे. तर ठाकरे गटाकडून शिंदे गटावर बोचरी टीका केली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत सेनेचे 40 आमदार आणि 12 खासदार फोडले. यावर बोलताना जाधव म्हणाले, आमदारांनी शिवसेनेशी विश्वासघात केला हे महाराष्ट्रातील जनतेला आवडलं नाही. उद्धव ठाकरे यांच्यासारख्या सोज्वल माणसाला ज्यांना राजकारण जमलं नाही त्यांना विश्वासघाताने खाली खेचले. या अनंत वेदाना सर्व जातीधर्माच्या लोकांमध्ये असल्याचे भास्कर जाधव म्हणाले.

रामदास कदम उलट्या काळजाचे
रामदास कदम (Ramdas Kadam) आहेत कोण? त्यांचा संबंध काय? रामदास कदम यांच्यासारखा कृतघ्न माणूस मी बघितला नाही.
ज्याप्रकारे ते उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भाषा वापरत आहेत. टीका करत आहेत. ते कदम इतके कृतघ्न असतील वाटलं नव्हतं.
त्याच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात दसरा मेळावा झाला तेव्हा तुम्ही तेने म्हणून भाषण केले.
आज त्याच उद्धव ठाकेरंना दसरा मेळावा घेऊन नये म्हणणं म्हणजे तुम्ही किती उलट्या काळजाचे आहात.
तुम्ही किती बेईमान आहात, असा घणाघात भास्कर जाधव यांनी केला आहे.

 

Web Title :- Shivsena Bhaskar Jadhav | there were repeated attempts by the bjp to incite riots in the state criticism of shivsena bhaskar jadhav

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | ‘हम जेल काट के आय है’ म्हणत गुंडांनी माजविली दहशत ! शिवाजीनगर येथील पाटील इस्टेटमध्ये दोन गटात राडा

 

Pune Crime | मोबाईलचा गैरवापर करुन दुकानदाराने घातला व्यावसायिकाला 12 लाखांना गंडा; उत्तमनगर पोलीस ठाण्यात FIR

 

Ghulam Nabi Azad | गुलाम नबी आझाद नव्या पक्षाची स्थापना करणार?