home page top 1

‘आमचं ठरलंय’, त्यात इतर कोणी नाक खुपसू नये’, उद्धव ठाकरेंनी ‘नाक’ खुपसणाऱ्यांचे ‘टोचले’ कान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – युतीबाबत आमचे ठरले, त्यामुळे त्यात कोणी नाक घालू नका अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि आमचे युती बाबतचे ठरले आहे. त्यामुळे इतर कोणीही यात पडू नये अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.

मुख्यमंत्री भाजपचाच होणार या गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रश्न केला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, ज्या गोरगरीब शेतकऱ्यांनी आपल्याला निवडून दिलं त्यांचे प्रश्न सोडवणे हे मुख्यमंत्री कोण होणार या विषयापेक्षा अधिक महत्वाचे आहे असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

फक्त मुख्यमंत्री पद महत्त्वाचे नाही –
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळाला का? उज्वला गॅस योजनेचा लाभ किती गरीबांना मिळाला?, गॅस घरोघरी खरोखरच पोहोचले आहेत का? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला का?, शेतकरी कर्जमुक्त झाला का? या सारख्या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे असे म्हणत, फक्त मुख्यमंत्री पद महत्त्वाचे नाही तर महाराष्ट्रातील प्रश्न महत्त्वाचे आहेत असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

‘शिवसेना सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सरकारमध्ये आहे. शेतकऱ्यांनी आपली दुःख बाजूला ठेऊन आपल्याला लोकसभा निवडणुकीत निवडून दिले. आता त्यांची दुःख दूर करणे आपले कर्तव्य आहे’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमचं सरळं काही ठरलं आहे, आता यापुढे सर्व समसमान पाहिजे अशी भूमिका देखील त्यांनी मांडली आहे.
आरोग्य विषयक वृत्त-
नंबर वाढला तर चष्म्याची लेन्स नियंत्रित करा, बदलण्याची गरज नाही
रोग प्रतिकारशक्ती दुबळी का होते ? जाणून घ्या
हाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा
निरोगी हृदयासाठी योग्य व्यायाम आणि आहार महत्वाचा

Loading...
You might also like