महायुतीच्या जागांचा फॉर्मुला काय ? ; भाजप-शिवसेना नेत्यांची बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना नेत्यांच्या जागा वाटपाच्या बैठकीला सुरवात झाली आहे. पहिली बैठक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मुंबई येथील निवासस्थानी पार पडली आहे. भाजपने या निवडणुकीची चांगलीच तयारी केली आहे. यात त्यांनी महायुती करून जागा लढल्यास किती जागा मिळतील याचा सर्व्हे देखील केला आहे.

तसेच विरोधी पक्षांमधील नाराज नेत्यांना आपल्या पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्नही करत आहे. दोन्ही पक्षांनी आपापली दावेदारी आणखीन मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

महायुतीच्या बैठकीची पहिली फेरी पार पडली
शिवसेनेचे नेते सुभाष देसाई तसेच भाजपाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा बैठकीला उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीच्या पहिल्या फेरीत महायुतीचा सर्व्हे आणि उरलेल्या जागांच्या वाटाघाटींवर प्राथमिक चर्चा झाली. सोबतच घटक पक्षांच्या वाट्याला किती जागा येतील यावरही चर्चा झाल्याचे समजते.

महायुती हेच दोन्ही पक्षांच्या हिताचे
भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या विजयानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्यासाठी भाजप-शिवसेना येतीचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. राजकीय वर्तुळात अनेक वेगवेगळ्या चर्चा ऐकू यात असतात त्यामुळे युती होईल कि नाही याबाबत ही कधी कधी संभ्रम निर्माण होत असतो. असे असले तरीही विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत महायुती करून लढल्यास किती जागा मिळतील, याचा सर्व्हेदेखील भाजपने करून ठेवला आहे.

आजच्या परिस्थितीत दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याचा धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. कदाचित म्हणूनच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी महायुती कायम राहील असे संकेत देत आहेत.

भाजपचा सर्व्हे रिपोर्ट, काय आहे यात
येत्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष चांगली मोर्चे बांधणी करत आहेत. भाजप – शिवसेना आणि इतर मित्रपक्ष अशी महायुती झाल्यास तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांच्या मित्रपक्षांसह जागा लढल्यास महायुतीला 229 जागा मिळतील, असे भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेतून समोर आले आहे. भाजपच्या नेत्यांकडून या सर्व्हे बाबत अनेक दवे केले जात आहेत. परंतु हे दावे निवडणुकांचा निखळ समजल्यानंतर ठळक समजले की, कोणाच्या दाव्यामध्ये किती दम होता. आकडे सादर करून विरोधकांचे मनोबल आणखी कमी करायचे कदाचित असाच प्लॅन असेल.

आरोग्यविषयक वृत्त