कोकणात बंडखोरी सुरूच, मंत्री दिपक केसरकर, नितेश राणेंच्या विरोधात भाजपच्या पदाधिकार्‍यांचं ‘बंड’

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीत रंगात येण्यास सुरुवात झाली असून शिवसेना आणि भाजप महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आता काही नेत्यांनी बंड करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे. काही नेत्यांनी तिकीट न मिळाल्याने बंडाचा झेंडा उगारला असून विरोधी पक्षांकडे जाण्याचा प्रयत्न सुरु केला आहे तर काही जणांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरु केली आहे.
त्यानंतर आता माजी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात युतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शिवसेना आमदार आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात देखील भाजप नेत्याने बंडखोरी केल्याने आता खरी रंगत निर्माण झाली आहे.

१)वेंगुर्ला- सावंतवाडी
या मतदारसंघात मागील वेळी नारायण राणे यांना काँगेसकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या मतदारसंघात दीपक केसरकर हे युतीकडून रिंगणात असून मागील वेळी त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. मात्र यावेळी मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने त्यांनी बंडखोरी केली असून ते अपक्ष रिंगणात उतरणार आहेत.

2)कणकवली- देवगड
या मतदारसंघातून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले नितेश राणे भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत. मात्र येथे देखील बंडाचे निशाण फडकवण्यात आले असून भाजप नेते संजय पारकर याठिकाणी निवडणूक लढवणार आहेत. पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते असलेले दोन्ही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्याचबरोबर सतीश सावंत देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक असून आज ते मातोश्रीवर गेले असून संध्याकाळपर्यंत त्यांचे चित्र देखील स्पष्ट होईल.

3)मालवण-कुडाळातही बंडखोरी?
या मतदारसंघात मागील वेळी शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा पराभव केला होता. त्यामुळे यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि राणे खांदे समर्थक असलेले दत्ता सामंत यावेळी अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे भाजपमध्ये असलेल्या नितेश राणे यांचे समर्थक आणि मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने एकप्रकारची याठिकाणी बंडखोरीचा दिसून येत आहे.

isit : Policenama.com