Shivsena BJP Alliance | शिवसेना-भाजपची खरचं युती होणार का? संजय राऊत गौप्यस्फोट करत म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका विधानावरुन राज्यात शिवसेना-भाजप युती (Shivsena BJP Alliance) होणार अशी चर्चा रंगू लागली. भाजपचे नेते रावसाहेब दावने (Raosaheb Davne) आणि भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्याकडे बघून आजी, ‘माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी’ असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप पुन्हा (Shivsena BJP Alliance) एकत्र येणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. यावर खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी संजय राऊत यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.

संजय राऊतांचा गौप्यस्फोट

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात जे वक्तव्य केलं ते ठाकरे स्टाईल भाषण होते. उद्धव ठाकरेंनी कुठेही म्हटलं नाही की, नवीन गठबंधन होईल, सरकार पडेल किंवा आम्ही या सरकारमधून बाहेर पडू. उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट संकेत आहेत की ज्यांना भावी सहकारी व्हायचं आहे ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. त्यांनी बोट दाखवून, नाव घेऊन सांगितलं आहे आणि ज्या हालचाली राजकारणात दिसत आहे. विशेषत: चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेलं वक्तव्य की माजी मंत्री म्हणू नका. याचाच अर्थ असा की, कुणीतरी तिकडे आहे ज्यांना इथे यायचे आहे आणि उद्धवजींनी संकेत दिले आहेत की तुम्ही या. बरेच लोक येऊ इच्छितात असं म्हणत त्यांनी गौप्यस्फोट केला आहे.

 

पतंग कधी कापायचा हे आम्हाला माहित आहे

संजय राऊत पुढे म्हणाले, हे सरकार पूर्णपणे पाच वर्षे चालणार. शिवसेना शब्दाची पक्की आहे.
शिवसेना कधी विश्वासघात करत नाही. शिवेसना पाठीत खंजीर खुपसत नाही.
शिवसेना दिलेला शब्द मोडत नाही त्यामुळे हे सरकार पडेल, नवीन गठबंधन होईल या भ्रमात कोणी राहू नये. ज्यांना पतंग उडवायचीये, त्यांनी उडवावी. कुणाची पतंग कधी कापायची.
हे आम्हाला समजतं, असं म्हणत त्यांनी शिवसेना-भाजप युती होणार नसल्याचे स्पष्ट केलं.

… अशा पक्षाशी हातमिळवणी कशी करु?

ज्या पक्षातल्या लोकांनी शिवसेना भवन (shivsena bhavan) फोडण्याची भाषा केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल अपशब्द काढतात, कानाखाली मारण्याची भाषा करतात.
ही जी नवीन संस्कृती समोर आली आहे, अशा पक्षांशी आम्ही हातमिळवणी कशी करु शकतो ?
असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.

 

Web Title : Shivsena BJP Alliance | will there really be an alliance between shiv sena and bjp sanjay raut gives this answer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Political News | भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक – अजित पवार

Pune News | मुस्लिम बांधवांच्या वतीने मानाच्या गणपतींच्या महाआरतीचे आयोजन; कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे म्हणाले – ‘पुण्यातील गणेशोत्सव हा सामाजिक सलोख्याचा आदर्श’

Satara Crime | पतीला निलंबित केल्याने पत्नीने घातला थेट ‘CEO’ च्या दालनात ‘राडा’