युतीमधील मेगाभरतीमुळं भाजप-सेनेत नवा ‘ट्विस्ट’, ‘हा’ नवा ‘फॉर्म्युला’ असणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीतही बाजी मारण्यासाठी भाजप-शिवसेना युतीचे प्रयत्न सुरू आहेत. युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अंतिम चर्चेला सुरुवात झाली असून दोन्ही पक्षात झालेलं इनकमिंग आणि मागच्या निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या टक्केवारीनुसार जागा बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीच्या चर्चेत आता नवा ट्विस्ट आला आहे.

जागावाटपात मतदार संघाची अदलाबदल होण्याची शक्यता-

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना – भाजप जागावाटपात 20 ते 25 जागांची अदलाबदल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दोन्ही पक्षात झालेलं इनकमिंग आणि मागच्या निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या टक्केवारीनुसार जागा बदलण्याची शक्यता आहे. भाजप व शिवसेनेलाही नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी द्यायची असल्यानं दोन्ही पक्ष काही जागा बदलणार आहेत. त्यामुळे जागावाटपात मतदार संघाची अदलाबदल होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची पडद्यामागून रणनिती –

विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात शिवसेनेला जेमतेम 100 ते 120 जागा देऊन इतर जागा भाजप आणि मित्रपक्षांच्या पदरात अलगद पडतील अशी रणनिती तर भाजपने आखली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला देशासह राज्यात मोठं यश मिळालं. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजप नेतृत्वाने महाराष्ट्रात युती करताना तडजोड न करण्याची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे शिवसेनेला लहान भावाची भूमिका स्वीकारावी लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –