शिवसेना नगरसेवकांमध्ये जुंपली ! एकाने दुसर्‍याच्या कानाखाली लगावली, जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या राजकारणातील वातावरण तापत आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या कार्यक्रमात शिवसेना नगरसेवकांनामध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसले. शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी स्वपक्षातील नगरसेवक रंगनाथ औटी यांच्या कानाखाली लगावली. या घडलेल्या प्रकारामुळे शिवसेनेत आणि कार्यालयात खळबळ उडाली आहे. तर हा सर्व प्रकार ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासमोर घडला आहे. त्यामुळे अधिक आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हा वाद मुख्यतः स्थायी समितीच्या वसुलीवरून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पालिकेची स्थायी समिती राष्ट्रावादी काँग्रेसच्या हाती आहे. तरी समितीची आर्थिक वसुली शिवसेनेचे हे दोन नगरसेवक करत होते. त्यातली एका कामाच्या टक्केवारीबाबत नामदेव भगत यांना करण्यात आला. त्यावर भगत यांची चिडून रंगनाख औटी यांच्या कानाखाली लगावली. त्यानंतर तेथील वातावरण अधिकच तापल्याचे दिसून आले.

दरम्यान, घडलेल्या प्रकारानंतर हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी रंगनाथ औटी यांची समजूत काढत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तसंच पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून या प्रकरणावर आतल्याआत सोडवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र या प्रकराणार अद्याप रंगनाथ औटी यांची प्रतिक्रिया आलेली नाही, की भगत यांनीही काही स्पष्टीकरण दिलेले नाही.

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

Loading...
You might also like