उपाशी पोटांचे शाप साध्वीच्या शापांपेक्षा प्रखर, उध्दव ठाकरींची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जेट एअरवेज प्रकरणावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे. मोदींनी पंडीत जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे दूरदृष्टी दाखवत जेट एअरवेजचा ताबा घ्यावा. जेटच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे शाप घेऊ नका. फक्त साध्वीच्या शापात दम आहे असे नाही. तर श्रम करणार्‍यांचे रिकाम हात आणि उपाशी पोटाचे शाप साध्वीच्या शापापेक्षा प्रखर आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंनी आपली भूमीका सामनाच्या अग्रलेखातून मांडली आहे. जेट एअरवेजवर आलेल्या आर्थिक संकटामुळे जेट ने आपली विमानसेवा बंद केली आहे. जेटचे २२ हजार कर्मचारी यामुळे रस्त्यावर आले आहेत. देशात बेरोजगारीचे भीषण संकट असतानाच जेट एअरवेजचे कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. पंतप्रधान प्रचारातच अडकले आहेत. निवडणूकीच्या या गदारोळात जेटच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश हरवून जात आहे. अशी भूमीका शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मांडली आहे.

देशात आजही उद्योगांना अडचणी आहेत. उद्योगांच्या वाढीसाटी पोषक वातावरण नाही. किंबहुना येथे येणारा आणि वाढणारा उद्योग हा केवळ राजकारण्यांना निवडणूक निधीसाठी कापता येणाऱ्या कोंबड्या आहेत, अशी टिका त्यांनी केली आहे. किंगफिशर आणि जेट हे संपुर्णपणे देशी उद्योग आहेत. मेक इन इंडीया, स्टार्ट अप इंडीयाची महत्त्वाची प्रतिमा होती. त्यामुळे हे उद्योग वाचविणे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते देशभक्तीचे काम आहे. उद्योग वाढवणे आणि वाचवणे हा सुद्धा राष्ट्रवाद आहे. हे आमच्या राजकारण्यांना कधी समजेल ? पाकिस्तानबरोबर युद्ध हाच राष्ट्रवाद नाही. बेरोजगारी आणि भूक या शत्रूंशी युद्ध हा सुद्धा एक प्रखर राष्ट्रवाद आहे. असे ते म्हणाले आहेत.

पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींची दूरदृष्टी
पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी विमान कंपन्यांचे व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयिकरण का केले, ते आता कळले. त्यांना दूरदृष्टी होती. हीच दूरदृष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेट प्रकरणात दाखवावी. देशी उद्योग मोडायचे आणि परक्या गुंतवणूकीसाठी पायघड्या घालायच्या हे राष्ट्रीय धोरण नाही. एअर इंडीया वाचविण्यासाठी सुमारे २९ हजार कोटी रुपयांचे पॅकेज सरकारने दिले. कारण ती राष्ट्रीय म्हणजे सरकारी कंपनी आहे. मग जेट, किंगफिशर या परदेशी कंपन्या नाहीत. त्याही स्वदेशी आहेत. असेही अग्रलेखात म्हटले आहे.