Shivsena Chief Uddhav Thackeray | पुण्यवान होण्यासाठी भाजपमध्ये जा, मुलाखतीतच उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांना सल्ला?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नितीन गडकरी (Nitin Gadkari) बोलले होतेच की, आमच्याकडे ‘वॉशिंग मशीन’ आहे. लोकांना घेऊन आम्ही ‘पुण्यवान’ करतो. त्यांच्याकडे जे लोक काही आरोपांमुळे गेलेत, त्यांचे पुढे काय झाले ते पण पाहावे लागेल. सध्या नवीन लोकांना त्रास दिला जात आहे. तुम्ही तिकडे गेलात तर तुम्ही पण पुण्यवान व्हाल, असे म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Shivsena Chief Uddhav Thackeray) संजय राऊतांना (Sanjay Raut) भाजपमध्ये (BJP) जाण्याचा सल्लाच दिला. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी सामनासाठी मुलाखत घेतली. त्याचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला आहे.

 

सामनात प्रसिद्ध झालेल्या या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. यावेळी ईडीच्या (ED) कारवाईवरुन उद्धव ठाकरे यांनी राऊतांना भाजपत जाण्याचा सल्ला देऊन टाकला.

 

शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्यांवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) म्हणाले, सेनेची लोक तिकडे गेली. आता ते पवित्र झाले असतील. तुमच्यावरही असे आरोप सुरु आहेत. तुम्हालासुद्धा ते अटक (Arrest) करणार असं वातावरण तयार केलं जात आहे. फक्त यंत्रणांचा गैरवापर दुसरे काय? याला काय म्हणायचं? पण तुम्ही हटत नाही. तुम्ही तिकडे गेलात तर तुम्ही पण पुण्यवान व्हाल, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी राऊतांना दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले, पहिली म्हणजे सर्वांना इच्छा असली पाहिजे. आणीबाणीच्या काळात लोकांनी तो अनुभव घेतला.
जनता पक्ष (Janata Party) स्थापन झाला होता. तुम्ही म्हणता ना, जनता काय करते? तर त्यावेळी आपण लहान होतो.
75-77 च्या काळातली गोष्ट. जनता पक्षाकडे प्रत्येक मतदार केंद्रावर पोलिंग एजंट पण नव्हते.
तरीसुद्धा लोकांनी भरभरून मतं दिली. सर्व स्तरांतील लोपं, मग साहित्यिक असतील. विचारवंत असतील.
त्यांनी बाहेर पडून आवाज उठवला होता. जनता पक्ष सत्तेवर आला. मात्र नंतर आपापसात भांडून स्वत:चे सरकार पाडून टाकले.
त्याच्यामुळे एक इच्छाशक्ती पाहिजे. की समजा, जर एकत्र यायचं झालं तर कोणीही पदावरुन भांडणार नाही.
आपल्या देशात सध्या लोकशाही संपून हुकूमशाही आली असे मी म्हणणार नाही.
पण ज्या दिशेने पावलं पडताहेत ती पाहता अनेक जणांचं मत आहे की, ही पावलं, ही लक्षणं काही बरी नाहीत. चुकीच्या दिशेने पडताहेत, अशी टीका त्यांनी केली.

 

Web Title :- Shivsena Chief Uddhav Thackeray | go to bjp uddhav thackerays order to sanjay raut in the interview

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | ‘नारायण राणे भाजपच्या टाकलेल्या तुकड्यावर जगतात’, शिवसेनेची टीका

 

Pune Crime | व्हिडिओ काढल्याच्या संशयावरुन महिलेच्या त्रासाने तरुणाने केली आत्महत्या; खडक पोलिस ठाण्यात गुन्हा

 

Supreme Court On PMLA Act | सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, PMLA अंतर्गत कारवाईच्या हस्तक्षेपास नकार