शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नीरेत उत्स्फुर्त स्वागत

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. १५) सांगली, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. हा दौरा आटोपून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नीरा मार्गे पुणेकडे जात असताना नीरा येथे त्यांचे रात्री सव्वाआठ वाजता आगमण झाले.

त्यावेळी नीरा येथील शिवाजी चौकात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, पंचायत समितीचे सदस्य डॉ. गोरखनाथ माने, दयानंद चव्हाण, बाळासाहेब गायकवाड, रणजित निगडे, संजय भंडारी, राजेंद्र पटणे, आदिराज कोठडिया यांच्यासह नीरा व परिसरातील शेकडो शिवसैनिकांनी त्यांचे उत्स्फुर्तपणे स्वागत केले.

यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गाडीतून उतरून शिवसैनिकांच्या स्वागताचा स्विकार केला. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

Visit : Policenama.com