Shivsena Chief Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचे ट्रम्पकार्ड, शिवतारे-आढळराव अन् सोनवणेंना शह देण्यासाठी बड्या नेत्याची शिवसेनेत घरवापसी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर अनेक आमदार आणि खासदार यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. त्यामध्ये खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barane), माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare), माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adharao Patil), माजी आमदार शरद सोनवणे (Former MLA Sharad Sonwane) यांनी शिंदे गटाची वाट धरली. पुण्यात झालेली पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी (Shivsena Chief Uddhav Thackeray) एका मोठ्या गटाला पुन्हा शिवसेनेत घेतले आहे. यामुळे शिवसेनेला पुण्यात मोठी मदत होण्याची शक्यता वर्तवली आहे.

 

माजी आमदार बाळासाहेब दांगट (Former MLA Balasaheb Dangat) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दांगट यांच्या प्रवेशामुळे पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात अनेक ठिकाणी ठाकरेंना हादरे बसले आहेत. त्यानंतर ठाकरेंनी (Shivsena Chief Uddhav Thackeray) जुन्या नेत्यांना पुन्हा साद घालण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले दांगट हे पक्षातील कुरघोड्यांना कंटाळून राजकारणापासून दूर केले होते. त्यांनी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला मात्र ते फारसे सक्रिय नव्हते.

 

कोण आहेत बाळासाहेब दांगट?

बाळासाहेब दांगट हे 1990 आणि 1995 मध्ये जुन्नर तालुक्यातून शिवसेनेचे लोकप्रतिनिधी होते. 2004 मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन काँग्रेसचा हात धरला. काही दिवसांपूर्वी दांगट यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या घरवापसीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांनी सदिच्छा भेट घेतल्याचे सांगितले होते. परंतु आज त्यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. जुन्नरमध्ये पुन्हा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेत पुन्हा सक्रिय होण्याचा शब्द त्यांनी ठाकरे यांना दिला.

 

बाळासाहेब दांगट यांच्यासह जुन्नर येथील राष्ट्रवादीचे (NCP) शहराध्यक्ष संतोष उर्फ बाब परदेशी,
माजी पंचायत समिती सदस्य सुनिल ढवळे, माजी उपसभापती अमोल पवार,
खेड येथील भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राहुल येवले यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

 

Web Title :- Shivsena Chief Uddhav Thackeray | maharashtra political crisis pune
junnar former shivsena mla balasaheb dangat joins shivsena again in presence of uddhav thackeray at matoshree

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा