Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘त्या’ एकनिष्ठ शिवसैनिकाला उद्धव ठाकरेंनी भेटीसाठी बोलावले, ‘मातोश्री’चा प्रतिसाद पाहून बसला सूखद धक्का

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena Chief Uddhav Thackeray | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Group) यांनी शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर अनेकजण त्यांच्या मागे गेले. मात्र लाखो शिवसैनिक आजही शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. अशाच एका शिवसैनिकाने शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आपली निष्ठा दर्शविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रक्ताने निष्ठापत्र लिहिले. हे पत्र वाचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्या शिवसैनिकाला मातोश्रीवर (Shivsainik On Matoshree) भेटीसाठी बोलावले. मातोश्रीवरुन मिळालेल्या प्रतिसादानंतर या शिवसैनिकाला सुखद धक्का बसला. (Shivsena Chief Uddhav Thackeray)

 

शिवसेना एसटी कामगार सेनेचे धुळ्यातील पदाधिकारी मनोज गवळी यांनी हे रक्ताने लिहिलेले निष्ठापत्र पाठवले होते. ते एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहेत. गवळी यांचे निष्ठापत्र पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्याशी संपर्क साधत मनोज गवळी यांना थेट मातोश्रीवर बोलावून घेतले.

 

गवळी मातोश्रीवर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
तसेच पक्षावर दाखविलेल्या निष्ठेबद्दल आभार व्यक्त केले.
मनोज गवळी यांच्यासोबत एसटी कामगार सेनेचे आय. एन. मिर्झा हे देखील उपस्थित होते.

 

Web Title :- msrtc bus st conductor supported shivsena chief uddhav thackeray by writing a letter with his own blood

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | चक्क पोलीस चौकीसमोरच मायलेकीची टोळभैरव बापलेकाकडून छेडछाड

Shivsena | शिवसेनेवर दावा सांगण्याचा उद्दामपणा शिंदेंचा नाही…हे भाजपचं कारस्थान; शिवसेनेने ‘रोखठोक’ सुनावले

Shanikrupa Heartcare Centre | विना शस्त्रक्रिया करता हृदयरोगावरील उपचारांसाठी भारतातील उत्कृष्ट प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर शनिकृपा हार्टकेअर सेंटर