Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘शिवाजी महाराजांचा अपमान करणारं…’, उद्धव ठाकरेंचा भगतसिंह कोश्यारींना खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज चांगला मुहूर्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक करण्यासाठी उत्तर भारतातील अर्थात काशीमधून गागाभट्ट आले होते. आज आम्ही उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात आलो आहोत. तर, शिवाजी महाराजांचा अपमान करणारे अॅमेझॉनचं पार्सलने माघारी जात आहेत, असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना लगावला. उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) बोलत होते.

 

भाजपाचं हिंदुत्व नेमकं काय आहे?

उत्तर भारतीयांना वेगळं म्हणण्यापेक्षा आता भारतीयांना याचं उत्तर पाहिजे की, भाजपाचं (BJP) हिंदुत्व नेमकं काय आहे? हे संपूर्ण भारताला जाणून घ्यायचंय. एकमेकांचा द्वेष करणं, हे हिंदुत्व नाहीये. मी आज तुमच्या सोबत आलोय. तुमच्यामध्ये आलोय. मी नेहमीच तुमच्यात राहू इच्छित होतो. मग मी यात चुकीचं काय करतोय? मागील 25-30 वर्षे आमची भाजपसोबत युती होती. ती एक राजकीय मैत्री होती. ती आम्ही निभावली. पण आम्हाला काय मिळालं? असा सवाल उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी यावेळी उपस्थित केला.

 

तेव्हा नरेंद्र मोदींना माझ्या वडिलांनी वाचवलं

शिवसेना-भाजपसाठी जेव्हा वाईट दिवस होते. तेव्हा माझ्या वडिलांनी आता जे पंतप्रधान आहोत, त्यांना वाचवलं होतं. ही गोष्ट खरी आहे. तेव्हा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (PM Atal Bihari Vajpayee) होते. ते राजधर्माचं पालन करण्यासाठी बाहेर पडले होते. वाजपेयी यांनी राजधर्माचं पालन केलं असतं तर आज जे पंतप्रधान पदावर बसलेत, ते तिथे बसलेले दिसले नसते. पण बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) तेव्हा कोणत्याही गोष्टीची पर्वा केली नाही, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली.

 

मन की नको, दिल की बात हवीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मन की बात (Man Ki Baat) वरुन टोला लगावताना उद्धव ठाकरे म्हणाले, उत्तर भारतीयांशी सेनेचं नातं मजबूत करण्यासाठी मी आलोय. उत्तर भारतीयांचा मेळावा नसून ही बैठक आहे. मेळाव्याला मैदान कमी पडेल. लोकांना आता मन की बात नको असून दिल की बात हवीय, असा टोला त्यांनी लगावला.

 

Web Title :- Shivsena Chief Uddhav Thackeray | my father balasaheb thackeray saved narendra modi uddhav thackeray statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा