
Shivsena Chief Uddhav Thackeray | रमेश वाळुंज भाजपचा कार्यकर्ता, आशिष शेलारांचा दावा वाळुंज कुटुंबाने खोडून काढला; उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत वाळुंज यांचा केला होता उल्लेख
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena Chief Uddhav Thackeray | शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये दावे-प्रतीदावे केले जात आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी 21 सप्टेंबर रोजी गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये (Nesco Center) झालेल्या गटप्रमुख यांच्या मेळाव्यात शिवसैनिकांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी रमेश वाळुंज (Ramesh Walunj) यांचा उल्लेख केला होता. रमेश वाळुंज यांनी समुद्रात वाहून जाणाऱ्या मुलींचा जीव वाचवला होता. मात्र यामध्ये रमेश वाळूंज यांचा मृत्यू झाला. शिवसेनेने रमेश यांच्या पत्नीला नोकरी दिली आधार दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले. ठाकरे यांचा दावा खोडून काढणारं ट्विट आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केले होते. वाळुंज कुटुंबीयांनी आशिष शेलार यांनी केलेला दावा आज पत्रकार परिषद घेऊन खोडून काढला.
काय म्हणाले आशिष शेलार?
बॅण्ड स्टँडच्या समुद्रात (Band Stands Sea) मुली वाहून जात असताना स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलींना वाचविताना मृत्यू झालेला रमेश वाळूंज हा भाजपचा (BJP) कार्यकर्ता होता. जेव्हा त्याने केलेले धाडस चर्चेत आले तेव्हा हा आमचा कार्यकर्ता आहे असे सांगत हे घरी पोहचले, असा दावा आशिष शेलार यांनी केला होता.
काय म्हणाले वाळुंज कुटुंबीय?
वाळुंज कुटुंबीयांनी आम्ही शिवसेनेत असून शिवसेनेत राहणार असल्याचं सांगितलं. वाळुंज कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत शिवसेना नेत्यांसोबतचे जुने फोटो देखील दाखवले. रमेश वाळुंज यांच्या मृत्यूनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray), सेना नेते अनिल परब (Anil Parab) त्यांच्या घरी गेले होते. आशिष शेलार यांनी देखील वाळुंज कुटुंबीयांची भेट घेतली होती.
वाळुंज कुटुंबीयांनी शेलार यांचा दावा खोडून काढल्यानंतर आशिष शेलार यांनी माध्यमांना यावर प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले उद्धव ठाकरे यांना योग्यवेळी उत्तर देणार असल्याचे त्यांनी म्हटले.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
गोरेगावमधील जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, काही वर्षांपूर्वी वांद्रा येथील वाळुंज यांच्या घरी गेलो होतो.
ऑफिसमधून घरी येत होता की ऑफिसला निघाला होता.
रमेश वाळुंज यांनी बुडणाऱ्या मुलींना हिंदू आहे की मुस्लीम आहे, मराठी आहे की अमराठी आहे हे न पाहता वाचवलं होतं.
दोन मुलींना वाचवलं होतं. तिसऱ्या मुलीला वाचवताना त्या मुलीचा आणि रमेश वाळुंज यांचा मृत्यू झाला होता.
शिवसेनेनं रमेश वाळुंज यांच्या पत्नीला नोकरी दिली आधार दिला, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
Web Title :- Shivsena Chief Uddhav Thackeray | ramesh walunj family members denined calim of ashish shelar and stand with shivsena and uddhav thackeray
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update