Shivsena | बालेकिल्ल्यातही शिवसेनेला खिंडार ? आदित्य ठाकरेंना शिंदे गटाचा मोठा झटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह अनेक आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे. यानंतर शिवसेनेला (Shivsena) अद्यापही एकावर एक झटके बसताना दिसत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत (Worli Constituency) शिंदे गट शिवसेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

 

वरळीतल्या अनेक सेना पदाधिकाऱ्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे आता हे पदाधिकारी शिंदे गटात (Shinde Group) सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या (Shivsena) बालेकिल्ल्यातही एकनाथ शिंदे यांनी एन्ट्री केली असल्याचे म्हटले जात आहे.

 

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॅनरबाजी पाहायला मिळाली.
वरळीचा श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या (Ganeshotsav) लाडका मार्केटचा राजाच्या स्वागत कमानीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर लावण्यात आले होते.
एवढंच नाही तर यावर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असंही लिहिण्यात आलं. तेव्हापासून चर्चांना उधाण आलं होतं.

 

वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर वरळीतील एकही पदाधिकारी, कर्यकर्ता शिंदे गटात गेला नव्हता.
परंतु आता पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातही सेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे.

 

Web Title : –  Shivsena | cm eknath shinde group big blow to aditya thackeray split in shiv sena in worli constituency

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा