Shivsena | खासदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेसमोरील पेच आणखी वाढला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Shivsena | आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेच्या 12 खासदारांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात बंडखोरी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे सध्या दिल्लीत असून त्यांनी दिल्ली शिवसेना खासदारांची बैठक घेतली. यानंतर खासदारांचा स्वतंत्र गट म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी 12 बंडखोर खासदारांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली. खासदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेने समोरील पेच आणखी वाढला आहे. (Shivsena)
एकनाथ शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात आम्ही राहुल शेवाळे (Rahul Shewale) हे गटनेते तर भावना गवळी (Bhavana Gawali) यांचा उल्लेख मुख्य प्रतोद म्हणून केला आहे. तसेच शिंदे यांनी 12 खासदारांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. (Shivsena)
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे.
या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले होते.
आता पुन्हा एकदा शिंदे यांनी दिल्लीत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. 12 बंडखोर खासदारांचा वेगळा गट तयार करून
तसे पत्र लोकसभा अध्यक्षांना शिंदे यांनी दिल्याने शिवसेनेला पुन्हा एकदा न्यायालयात धाव घ्यावी लागणार नाही.
Web Title :- Shivsena | cm eknath shinde press conference in delhi 12 mp give letter to loksabha speaker om birla rahul shewale bhavna gavali
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update