Coronavirus : ‘वुहान’ला लागले 70 दिवस, महाराष्ट्राला किती ? मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ‘हे’ 17 महत्वाचे मुद्दे, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधून राज्यातील सद्य परिस्थितीची माहिती दिली. यावेळी त्यांनी जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन करत चिंता व्यक्त करा पण घाबरून जाऊ नका असे आवाहन त्यांनी केले. तसेच मुंबई-पुण्यात घरोघरी चाचण्यांची संख्या वाढवतोय. जलद चाचणी, वैद्यकीय उपकरणे आम्ही प्रमाणित करून घेत असल्याची माहिती देताना सध्या 80 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 64 मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 17 मुद्दे
1. कोरोनाच्या लढाईत आरोग्य यंत्रणा, पोलीस अहोरात्र काम करत आहे. पण प्रथमच मी आपल्या यंत्रणेतील सर्व विभागांना धन्यवाद देतो.
2. मंगळवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत सर्वजण मास्क लावून बसलेले आपण पाहिले असेलच. ही पहिली अशी व्हिडिओ कॉन्फरन्स होती. सर्व मंत्र्यांनी एकमेकांमध्ये अंतर पाळले होते. मात्र, मानसिकदृष्ट्या आम्ही एक होतो आणि आहोत.
3. मला कल्पना आहे कोरोना रुग्ण आपल्या राज्यात सापडून आता 4 आठवडे पूर्ण झाले आहे. आपल्याकडे रुग्णांचे आकडे वाढताहेत ही वस्तुस्थिती आहे. हि चिंतेची बाब असली तरी घाबरून जाऊ नका. आपण सर्व ताकदीनिशी प्रयत्न करत आहोत. आपल्याकडे मला रुग्णांमध्ये थोडीशीही वाढ नको असे मी सांगितले आहे. कोरोना आपल्या मागे लागला आहे. पण आपण देखील कोरोनाच्या पाठिमागे ‘हात धुवून’ लागलो आहोत.
4. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, लॉकडाऊनमुळे आपली गैरसोय होत आहे. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो पण हे युद्ध आपल्याला जिंकायचे असेल तर आपली घरे हेच आपले गड किल्ले आहेत असे समजा.
5. टीव्ही वाहिन्यांना आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाच्या बातम्या तर आहेतच. पण नागरिक तणावमुक्त राहतील आणि वातावरण हलकेफुलके राहील असेही कार्यक्रम दाखवा.
6. ज्यांना हृदयविकार, मधुमेह, स्थूलपणा आहे त्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. बंधने ठेवा, कारण हे सर्व हाय रिस्क ग्रुपमध्ये आहेत. घरी रहा पण तंदरुस्त रहा.
7. घरामध्ये असताना योगासने, हलके फुलके व्यायाम करा. कारण हे युद्ध आपण जिंकणारच आहोत पण यानंतरचे युद्ध घसणाऱ्या अर्थव्यवस्थेशी आहे. त्यासाठी आपली ताकद, हिंमत लागणार आहे.
8. जगभरातल्या बातम्या येत आहेत. अमेरिका, जपान, सिंगापूर येथील आकडे वाढत आहेत. पण कालच एक बातमी आली की चीनच्या वुहानमध्ये निर्बंध उठवण्यात आले आहेत. ही दिलासा देणारी बातमी आहे. त्यांना यासाठी 70 ते 75 दिवस लागले. आपण जर असाच दक्षतेने सामना केला तर आपल्याकडे देखील ही परिस्थिती बदलेल अशी मला खात्री आहे.
9. जे लोक गरीब आहेत, गरजू आहेत त्यांच्यासाठी आपण राज्यात शिवभोजनाची सोय केली आहे. निवारा केंद्रात 6 लाख लोकांना दिवसातून दोन वेळचे जेवण दिले जात आहे. त्यांना सकाळचा नाश्ता देखील दिला जात आहे. माणुसकी हा एक धर्म आहे जो आम्ही पाळत आहोत.
10. केंद्राने जाहीर केलेल्या मोफत धान्याचे वाटप ही सुरु झाले आहे. केंद्राचे सहकार्य मिळत आहे.
11. केशरी शिधापत्रिकाधारक मध्यमवर्गीय आहेत त्यांच्यासाठी 3 किलो गहू 8 किलो दराने आणि 2 किलो तांदूळ 12 किलो प्रति दराने देण्याचा निर्णय घेतला आहे.
12. पीपीई किट्स, मास्कचा तुटवडा जगभरात आहे. आता आपल्या देशात महाराष्ट्र, गुजरातमध्ये व्हेंटिलेटर बनविणे सुरु आहे. पीपीई कीटसारख्या काही गोष्टी आपण बनवत आहोत. सर्व सुविधा वाढवण्यात येत आहे. पण रोगाचे रुग्ण लक्षात घेता या सुविधा, उपकरणे प्रमाणित असणे गरजेचे असले पाहिजे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
13. आपण वस्तू खरेदीसाठी बाहेर जात असाल तर मास्क घालणे आवश्यक आहे. त्यामध्ये काही गैर नाही. तसेच घरातील स्वच्छ कपड्याने देखील चेहरा झाकला जाऊ शकतो. पण घरात छत्रीसारखा तो घरातल्या सर्व व्यक्तींनी वापरणे योग्य नाही. तसेच वापरलेला मास्कची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे गरजे आहे.
14. फिव्हर क्लिनिक सुरु केले आहेत याठिकाणी आपली तपासणी करा.
15. कोविड उपचारासाठी आम्ही रुग्णालयांची विभागणी केली आहे. ज्यांना सौम्य लक्षणे असतील, मध्यम स्वरुपाची तसंच कोरोना शिवाय इतरही रोग असतील तर अशा तीन रुग्णालयांची विभागणी केली असेल. त्यात निष्णात डॉक्टर असतील.
16. निवृत्त सैनिक आहेत, ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे. अनेक वॉर्ड बॉय, निवृत्त परिचारिका, वैद्यकीय सहायता प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्ती ज्यांना सध्या काम मिळालेले नसले त्यांना सहभागी करून घेणार आहोत. त्यांना मी आवाहन करतो की महाराष्ट्रातील आपली गरज आहे. केवळ अशांनी [email protected] या मेलवर आपली माहिती पाठवावी.
17. मुंबई-पुण्यात घरोघर चाचण्यांची संख्या वाढत आहे. जलत चाचणी, वैद्यकीय उपकरणे आम्ही प्रमाणित करुन घेतोय. सध्या 80 हजार बरे होऊन घरी गेले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like