शिवसेनेचे भाजपवर टीकेचे बाण, म्हणाले – ‘ट्विटरच्या अतिरकेचा वापर करूनच भाजपनं निवडणुका जिंकल्या, मग आता मोदी सरकारचा विरोध का?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  काही दिवसापासून भाजप आणि ट्विटर यांच्यात संघर्ष सुरु आहे. कालपर्यंत भाजप आणि मोदी सरकारसाठी (Modi Government) राजकीय लढ्याचा अथवा प्रचाराचा ट्विटर आत्मा होता. त्याचा वापर करून २०१४ च्या निवडणूका जिंकल्या. त्या ट्विटरचे आता भापजासाठी राजकीय महत्त्व संपले आहे. भाजपला ते आता ओझे वाटू लागले आहे. त्यामुळे हे ओझे फेकून देण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून करण्यात येत आहे. कारण ट्विटरने खोट्या नाट्या प्रचाराला उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अनेक ठिकाणी भाजपला किंबहूना मोदी सरकारला (Modi Government) माघार घ्यावी लागत आहे, अशा शब्दात शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

Corona Vaccination | ‘कोविशील्ड’ घेतलेल्यांना मोठा दिलासा तर ‘कोव्हॅक्सिन’ अन् ‘स्पुटनिक’ लस घेतलेल्यांना धक्का, जाणून घ्या

भारतासाठी ट्विटर हे जीवनावश्यक वस्तू नाही किंवा अत्यावश्यक सेवा नाही.
ट्विटर हे जगातील अनेक देशांना माहिती नाही..चीन, उत्तर कोरियात ट्विटर नाहीच.
तर नायजेरीयानेही देशातून समाजमाध्यमाची हकालपट्टी केली आहे.
हिंदुस्तानातही ट्विटरवरून वादळ उठले आहे. कालपर्यंत हे ट्विटर म्हणजे भाजप किंवा मोदी सरकारसाठी त्यांच्या राजकीय लढ्याचा किंवा प्रचाराचा आत्मा होता.
आता भाजपला ट्विटरचे ओझे झाले असून, हे ओझे कायमचे फेकून द्यावे या निर्णयाप्रत मोदींचे सरकार आले आहे.
मोदी  सरकारच्या नियंत्रणाखाली देशातील सर्व मीडिया प्रसारमाध्यमे आहेत.
पण ट्विटरसारखी माध्यमे बेलगाम आहेत. त्यावर मोदी सरकारचे नियंत्रण नाही.
भारताचा कायदा त्यांना लागू नाही समाजमाध्यमांसाठी एक कठाेर नियमावली माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केली आहे.
त्याचे पालन करा अथवा कारवाई सामोरे जा असा इशारा मोदी सरकारने देऊनही ट्विटर ऐकायला तयार नाही.
ट्विटरवाले सांगतात की, आमचा कायदा व आमचे न्यायालय अमेरिकेत. तुमच्या भूमीचा कायदा मान्य नाही.

गेल्या काही वर्षांपासून समाजमाध्यमांवर चिखलफेकीचा, बदनामी मोहिमांचा कार्यक्रम सुरू आहे या सर्वांच्या पाठिमागे भाजपच होते.
सामाजिक माध्यमांचा वापर कसा करायचा याबाबत राजकीय पक्षांना माहिती नव्हते पण २०१४ च्या निवडणूकीत भाजपने त्यात नैपुण्य मिळवले.
फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍपच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला.
भाजप च्या फौजा जमिनीवर कमी, पण सायबर क्षेत्रांतच जास्त खणखणाट करीत होत्या.
भारतातील समाज माध्यमांचे जणू आपण मालकच आहोत व सायबर फौजांच्या माध्यमांतून आपण कोणतेही युद्ध, निवडणूक जिंकू शकतो, विरोधकांना उद्ध्वस्त करू शकतो, असा एकंदरीत भाजपचा तोरा होता.
असा टोलाही शिवसेनेनं लगावला उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांच्या निवडणुका जिंकताना राजकीय विरोधकांची यथेच्छ बदनामी करण्यात येत होती.

त्या काळात राहुल गांधी यांना ज्या शब्दांत ट्विटर किंवा फेसबुकवर शिवराळ शब्द वापरले गेले ते कोणत्या नियमात बसले? मनमोहन सिंगांसारख्या ज्येष्ठ नेत्यास काय काय विशेषणे लावली? उद्धव ठाकरे  यांच्यापासून ममता बॅनर्जी, शरद पवार, प्रियांका गांधी, मुलायम सिंग यादव अशा राजकारण व समाजकारणात हयात घालविलेल्या नेत्यांच्या विरोधात या ट्विटरवगैरेंचा वापर करून बदनामी मोहिमा राबविल्या गेल्या.
एकूणन भाजपने या सामाजिक माध्यमांचा आपल्या पद्धतीने वापर करून घेतला आता मात्र, याच सामाजिक माध्यमांचा वापर करून विरोधकांनी हल्ले सुरु केल्याने भाजपच्या तंबूत घबराट पसरली आहे.

नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीत तृणमूल काँग्रेने ट्विटर सारख्या सामाजिक माध्यमांचा वापर केला.
टीएमसीच्या महुआ मोईत्रा, डेरेक ओब्रायन या जोडीने ट्विटरच्या दुधारी तलवारीने भाजपलाच घायाळ केले.
बिहार निवडणुकीतही तेजस्वी यादवने तीच रणनिती आखून मोदी व नितीश कुमारांना उघडे केले.
राहुल गांधी व प्रियांका गांधी या व्टिटरच्या माध्यमातून मोदी व त्यांच्या सरकारला ‘जोर का झटका धीरे से’ देत असतात व त्याचे पडसाद देशभरात उमटताना दिसतात.
ज्यावेळी भाजप सरकारने उपराष्ट्रपती नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ‘ब्लू टिक’ हटवल्याने व्टिटरसोबत भांडण करण्यास सुरुवात केली.
त्यावरून राहूल गांधी यांनी ब्लू टिक के लिए मोदी सरकार लड रही है – कोविड टिका चाहिए तो आत्मनिर्भर बनो! अशी शुद्ध हिंदीत व्टिट केले.
ही टीका मोदी सरकारला घायाळ करणारी होती.
यांसारखे अनेक शब्दबाण सरकार आणि भाजपवर सुट असल्याने त्यामुळे भाजप आक्रोश करत असल्याचेही शिवसेनेने अग्रलेखात म्हंटले आहे.

 

Web Title :  shivsena commented narendra modi government and twitter war