भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण मिळताच काँग्रेस, शिवसेनेच्या गोटात प्रंचड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असताना दोन्ही पक्षांमध्ये सत्तासंघर्ष सुरु झाला आहे. त्यातच आज राज्यपालांनी मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले. भाजपला सत्तास्थापनचे निमंत्रण मिळताच काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची वर्दळ वाढली आहे तर दुसरीकडे काँग्रेसने थेट जयपूरला आमदारांना ठेवले असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवाना झाले आहेत.

शिवसेनेचे नेते अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, गजानन कीर्तीकर, आदेश बांदेकर, एकनाथ शिंदे, रामदास कदम आदी नेते शिवसेनेच्या नेत्यांना ठेवण्यात आलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. या हॉटेलमध्ये असलेल्या आमदारांशी ते संपर्क साधणार असल्याचे सुत्रांची माहिती आहे. तर काँग्रेसने त्यांच्या जयपूरला अज्ञातस्थळी हलविले असून त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, निवडणूक प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण जयपूरला रवाना झाले असून ते उद्या आमदारांशी चर्चा करणार आहेत. तर राष्ट्रवादीने अद्याप असे कोणतेही पाऊल उचलेले नसून 12 नोव्हेंबरला शरद पवार आमदारांशी चर्चा करणार आहेत.

शिवसेना आणि भजपला जनादेश मिळाला आहे. मात्र, शिवसेनासोबत येण्यास तयार नाही. पण आम्हाला दुसरा पर्याय नसून शिवसेनेसोबतच बहुमत सिद्ध करण्याची इच्छा असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान भाजपकडे 105 आमदारांच संख्याबळ आहे. 18 आमदारांचा पाठिंबा असल्याचे मुनगंटीवार यांनी दावा केला आहे. 18 आमदारांचा पाठिंबा मिळाला तर संख्याबळ 123 होते. बहुमताचा आकडा गाठायचा असेल तर अजून 22 आमदारांची गरज आहे. बहुमताचा हा आकडा कसा गाठायचा यावर उद्याच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा करु अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like