अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी लाच घेणारा शिवसेनेचा नगरसेवक अँटी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनधिकृत बांधकामावर कारवाई करु नये, म्हणून १० हजार रुपयांची लाच घेताना शिवसेनेचे नगरसेवक कमलेश भोईर याला मध्यस्थासह ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. भोईर हा काशिमिरा भागातील नगरसेवक आहे. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

मिरा गावातील कमलेश भोईर आणि त्यांचे कुटुंब हे अतिशय श्रीमंत मानले जाते. २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भोईर हा प्रभाग १५ मधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आला आहे. तर पॅनलमधील अन्य तीन नगरसेवक हे भाजपचे आहेत. निवडणुकीपूर्वी व नंतरही त्यांना भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न स्थानिक भाजपकडून केला जात होता.

तक्रारदाराने सोमवारी रात्री १० हजार रुपये मध्यस्थ असलेला ठेकेदार गोरखनाथ ठाकूर शर्मा याच्याकडे दिल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली.

मिरा रोड पालिकेच्या मुंशी कंपाऊंडमधील एका घराची बेकायदा उंची वाढविण्याच्या कामाची तक्रार करु नये म्हणून तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात अखेर १० हजार रुपयांवर तडजोड झाली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा आडनाईक यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like