विमान अपघात थोडक्यात टळला ; शिवसेनेच्या ४० नगरसेवकांचे बचावले प्राण

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – राजधानी दिल्लीच्या दिशेने जाणारे ‘गो एअर’ कंपनीचे विमान हवेत असताना त्यात बिघाड जाणवू लागण्याने त्या विमानाच्या वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान मुंबईच्या दिशेने वळवले. मुंबईच्या विमानतळावर या भरकटलेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमान जमिनीवर उतरताच विमानात बसलेल्या प्रवाश्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या विमानात बसलेले प्रवासी हे ठाणे महानगर पालिकेचे शिवसेना नगरसेवक होते. राजधानी दिल्लीचे कामकाज कसे चालते हे पाहण्यासाठी त्यांची सहल दिल्लीच्या दिशेने निघाली होती.

विमानाने हवेत उड्डाण घेतल्या नंतर तीस मिनिटांनी या विमानामध्ये वैमननिकाला बिघाड जाणवू लागला. त्याने विमानात बसलेल्या सर्व नगरसेवकांना याची सूचना दिली आणि कोणीही गरबड करू नका असे सांगितले. सतर्कतेच्या बळावर या वैमानिकाने ते विमान मुंबईच्या विमानतळावर उतरवले. त्यानंतर त्या नगरसेवकांनी निश्वास सोडला.  विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाने कंट्रोल रूमला फोन करून सांगितले. कंट्रोल रुम  मधून हे विमान माघारी विमानतळावर घेऊन येण्याचे आदेश वैमानिकाला दिला. त्या वैमानिकाच्या सुसूत्रतेमुळे आज मोठा अपघात टळला आहे.

“वेळ आली होती पण काळ आला नव्हता” अशीच प्रतिक्रिया या विमानात प्रवास करणाऱ्या नगरसेवकांनी दिली आहे. विमानातील बिघाडा मुले अन्य एका विमानाने हे नगरसेवक दिल्लीकडे रवाना झाले आहेत. या घटनेने या विमानात प्रवास करणाऱ्या नगरसेवकांच्या घरच्या लोकांमध्ये हि थोड्या वेळासाठी घबराहट पसरली होती.