मुख्यमंत्री शिवसेनेचाच म्हणत शिवसेना नगरसेविकेची ‘पोस्टरबाजी’ !

नाशिक : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीतील मित्रपक्ष शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु आहे. मोठ्या नेत्यांकडून ज्याप्रकारे या संदर्भात नवनवीन विधाने येत आहेत त्याच पद्धतीने स्थानिक पातळीवर देखील पदाधिकारी या विषयावर भाष्य करत आहेत. अशाच प्रकारे नाशिकमधील शिवसेनेच्या एका नगरसेविकेने फ्लेक्स लावत मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे पोष्टर या नगरसेविकेने लावल्याने पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

याआधी भाजप नेत्या आणि महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी या विषयावर भाष्य करताना म्हटले होते कि, मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार. नाशिकमधील शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी हा फ्लेक्स लावला असून यामध्ये मुख्यमंत्री शिवसेना भाजप युतीचाच होणार. याचा अर्थ शिवसेनेचाच होणार असे लिहिले आहे. त्यानंतर आता या फ्लेक्स युद्धाने पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांच्यात या पदावरून वाकयुद्ध रंगणार असे दिसत आहे. संपूर्ण शहरात दोन ते तीन ठिकाणी अशा प्रकारचे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत.

दरम्यान, शिवसेना आणि भाजपचा मुख्यमंत्री प्रत्येकी अडीच वर्ष असावा अशी ऑफर सुरुवातीला शिवसेनेकडून देण्यात आली होती. मात्र त्यानंतर भाजपने पाच वर्ष आमचाच मुख्यमंत्री राहणार असे म्हटल्याने शिवसेनेनेदेखील मुख्यमंत्रीपदावर आपला हक्क सांगितल्याने आता शिवसेना आणि भाजपमधील ही मुख्यमंत्रीपदाची लढाई विधानसभा निवडणुकीत काय वळण घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

Loading...
You might also like