शिवसेनेचा मेहबुबा मुफ्ती यांच्यावर ‘निशाणा’, ‘या’ लोकांनी पाकिस्तानात जायला हवं !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या कलम ३५ A वर केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेनं त्यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्यावर निशाणा साधला आहे. मेहबुबा यांची हीच वृत्ती आहे. त्याने केलेल्या वक्तव्यावरून समजते की मेहबुबा यांना पाकिस्तान आणि आतंकवाद्यांची अधिक ओढ आहे. अशा लोकांनी भारतात राहण्याऐवजी पाकिस्तानला गेले पाहिजे, असं मनीषा कायंदे यांनी यावेळी म्हटलं.

मेहबुबा यांनी कधीच आतंकावाद्यांचा विरोध केला नाही. त्यांच्या या असल्या धमक्यांनी मागील सरकारे घाबरली असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वातील सरकार त्यांच्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही. पाकिस्तानकडून सतत फायरिंग होत आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवणे अधिक गरजेचे आहे. धडा शिकवल्याशिवाय ते सुधारणारे नाहीत, असंही मनीषा यांनी यावेळी म्हटलं.

मनीषा यांनी मेहबुबा यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर मत व्यक्त केले. शरद पवार यांना असे का वाटतंय की त्यांच्या नेत्यांना ईडीकडून घाबरवले जात आहे. जर ते हे म्हणतात की त्यांच्या नेत्यांनी काहीच चुकीचे केले नाही, तर मग ते का घाबरत आहेत. खरं तर तुमच्या नेत्यांना तुमच्या नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे ते पक्षांतर करत आहे, असं मनीषा यांनी यावेळी म्हटलं.

आरोग्यविषयक वृत्त –