Shivsena Dasara Melava 2022 | दसरा मेळावा शिवतीर्थावरच! उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आदेश, म्हणाले…

मुंबई : Shivsena Dasara Melava 2022 | शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांनासोबत घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत. ते आज शिवसेना भवनात आयोजित विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांसह प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या तयारीसंदर्भात नेत्यांना महत्त्वाच्या सूचना करत आदेश दिले. (Shivsena Dasara Melava 2022)

शिंदे गट आणि भाजपाने शिवसेनेची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याबाबत संभ्रम निर्माण केला होता. दसरा मेळावा आम्हीच घेणार असे म्हणत शिंदे गटाने थेट प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या परंपरेलाच हात घातला होता. यावरून दोन्हीकडील नेते परस्परविरोधी दावे करत होते. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार, असे म्हणत नेते आणि शिवसैनिकांना तातडीने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. (Shivsena Dasara Melava 2022)

या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि सर्व पदाधिकार्‍यांना शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचे आदेशही दिले.
या बैठकीत बंडखोरांवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना फोडण्याआधी इतिहास जाणून घ्यावा.
फुटलेले सर्व नेते तोतया आहेत. जनता त्यांना त्यांचा मार्ग दाखवेल.
दसरा मेळाव्यासाठी सर्व आघाड्यांना सोबत घेऊन कामाला लागा, असे ठाकरे म्हणाले.
दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये जोश भरला आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, हा प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्यावर सत्ताधारी अपयशाचे खापर आमच्यावर फोडत आहेत.
प्रकल्प राज्यात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने खूप प्रयत्न केले.

Web Title :- Shivsena Dasara Melava 2022 | Shivsena chief uddhav thackeray meeting in shiv sena bhavan on dasara melava reaction on vedanta foxconn row