Shivsena Dasara Melava | शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास दोन्ही गटांना BMC चा नकार

मुंबई : – Shivsena Dasara Melava | गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) घेण्यावरुन शिंदे गट आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. या दोन्ही गटांकडून शिवाजी पार्कवर परवानगी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आले होते. या अर्जावर आता मुंबई महापालिकेने निर्णय घेतला आहे. शिवाजी पार्कवर दोन्ही गटांना परवानगी नाकारण्यात आल्याचे पत्र महापालिकेकडून देण्यात आले आहे. (Shivsena Dasara Melava)

महापालिकेने काय म्हंटले ?

मुंबई महापालिकेने (BMC) शिंदे गटातील नेते आमदार सदा सरवणकर (Sada Saravankar) यांना हे पत्र दिले. या पत्रात दोन्ही गटाकडून मेळाव्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. पण कोणत्याही एका गटाला ही परवानगी दिली गेल्यास या परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे आम्ही दोन्ही अर्जदारांना परवानगी नाकारत आहोत,असे स्पष्टीकरण महापालिकेने आपल्या पत्रात म्हंटले आहे. (Shivsena Dasara Melava )

या विरुद्ध शिवसेनेने शिवाजी पार्क मैदान परवानगीवरुन मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्याबरोबर 40 आमदार घेऊन शिवसेनेतून बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली
आहे. त्यातच आता काही महिन्यातच महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.

Web Title :- Shivsena Dasara Melava | bmc denied permission to thackeray and shinde group to hold dussehra rally at shivaji park

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Keshav Upadhye | ‘त्यांची नजरही आता भ्रष्ट झाल्यामुळे गिधाड आणि गरुड यांच्यातला फरक कळत नाहीे, अमित शाह हे…’

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंची टीका फडणवीसांच्या जिव्हारी, म्हणाले – अडीच वर्षांत तिघे मिळून मला संपवू शकला नाहीत, यापुढे…