Shivsena Dasara Melava | शिंदे-फडणवीस सरकारचा डाव ? शिवसेनेची ‘दसरा मेळाव्या’ ची परंपरा यंदा खंडित होणार ? अर्ज करुनही अद्याप परवानगी नाही;

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दहीहंडी (Dahi Handi) उत्सवाच्या वेळी वरळीचं जांबोरी मैदान (Jamboree Ground) पटकावून भाजपने (BJP) शिवसेनेवर कुरघोडी केली होती. यानंतर आता शिवसेनेचा दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कात (Shivaji Park, Dadar) होतो. मात्र, यंदा शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडित होण्याची चिन्ह दिसत आहेत. मुंबई महापालिकेकडून (BMC) मेळाव्याला (Shivsena Dasara Melava) परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेनं अर्ज दाखल केला असताना, महापालिकेनं मात्र हात आखडता घेतल्याची माहिती मिळत आहे.

 

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केले आणि शिवसेनेत उभी फूट पडली. एकापाठोपाठ एक आमदार (MLA), खासदार (MP), नगरसेवक शिंदे गटात (Shinde Group) सहभागी झाले. त्यानंतर खरी शिवसेना आमचीच असा दावा शिंदे गटाकडून केला जाऊ लागला. यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला. राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशातच आता शिवसेनेसाठी महत्त्वाचा असलेला दसरा मेळावाच (Shivsena Dasara Melava) हिसकावण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray) यांनी यंदाचा दसरा मेळावा जाहीरपणे शिवतीर्थावरच घेणार, असा विश्वास शिवसैनिकांना दिला होता.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं नव्हतं.
गेल्यावर्षी उद्धव ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा पार पाडला होता.
आता कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने सर्व सण – उत्सव, राजकीय कार्यक्रमांवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत.
यामुळे यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी जाहीर केले आहे.

 

दसरा मेळाव्याला परवानगी मिळवण्यासाठी शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेकडे (Mumbai Municipal Corporation) अर्ज करण्यात आला आहे.
पण अद्याप शिवसेनेला कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे.
शिंदे गटाकडून वारंवार शिवसेना पक्ष, पक्षाचं चिन्ह यांवर दावा केला जात आहे.
अशातच आता शिंदे गटाकडून शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक होणार का ? अशी चर्चा सध्या सुरु आहे.

 

Web Title : –  Shivsena Dasara Melava | cm eknath shinde vs uddhav thackeray shiv sena dussehra melava hijacked by cm eknath shinde group

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा