24 वर्षांपासून एकाच विभागात असलेल्या ‘त्या’ अधिकार्‍याची बदली करा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या नगररचना विभागात 24 वर्षांपासून एकाच पदावर असलेले के. वाय. बल्लाळ यांचे आयुक्त श्री कृष्ण भालसिंग यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत. त्यांची त्वरित नगररचना विभागातून दुसऱ्या विभागात बदली करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांची नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे आज केली आहे.
Shivsena Letter

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिकेत 1995 पासून कार्यरत असलेले के. वाय. बल्लाळ आणि महानगरपालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांचे घनिष्ठ संबंध आहेत. काही ठराविक विकासक आणि बिल्डर यांना हाताशी धरून चुकीच्या पद्धतीने काम केले जात आहे. त्यामुळे त्यांची बदली इतर विभागात करावी.

गेल्या 24 वर्षांपासून बल्लाळ हे नगररचना विभागात एकाच पदावर कार्यरत आहेत. त्यांची बदली का होत नाही, हा एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच त्यांच्याकडील संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणीही बोराटे यांनी केली आहे. नगर शहरातील नागरिकांची कामे या एका अधिकार्‍यामुळे खोळंबली आहेत. त्यामुळे बल्लाळ यांना त्वरित नगररचना विभागातून हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

Loading...
You might also like