Homeताज्या बातम्याShivsena | 'अजूनही विचार करावा, आमचे काही म्हणणे नाही'; अरविंद सावंत स्पष्टच...

Shivsena | ‘अजूनही विचार करावा, आमचे काही म्हणणे नाही’; अरविंद सावंत स्पष्टच बोलले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे (Shivsena) बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray Government) जाऊन शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आले. यानंतर नुकताच मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाला. परंतु या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शिंदे गटातील (Shinde Group) अनेक आमदार नाराज दिसत आहे. या पार्श्वभूमीवर हे नाराज आमदार पुन्हा शिवसेनेच्या (Shivsena) संपर्कात असल्याचे म्हटले जातेय.

 

यासंदर्भात अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना विचारले असता, ‘आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) महाराष्ट्राचा दौरा करताना सांगत आले आहेत, की आमचे दरवाजे खुले आहेत. त्यामुळे ज्यांना वाटते त्यांनी अजूनही विचार करावा, आमचे काही म्हणणे नाही’ असे अरविंद सावंत यांनी म्हटले. ते एका वृत्तपत्राच्या वेबसाइटशी बोलत होते.

 

यावेळी शिवसेनेने (Shivsena) त्यांचे परतीचे दोर अद्यापही कापलेले नाहीत ? असे अरविंद सावंत यांना विचारण्यात आले. त्यावर सावंत म्हणाले, आम्ही त्यांना म्हणालोय का, की तुमचे परतीचे दोर कापले आहेत ? पण कुठल्या गद्दारांना क्षमा करावी, हा मिलियन डॉलर प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी स्वत: च स्वत: चे परतीचे दोर कापले आहेत, असे सावंत यांनी सांगितले.

 

… त्यांच्यासाठी संजय राऊत आदर्श

सावंत म्हणाले, ती सर्व असंतुष्ट माणसं, घाबरेली माणसं, ईडीच्या (ED) भीतीपोटी घाबरलेली माणसं आहेत.
खरे तर ईडीच्या भीतीपोटी घाबरलेल्या माणसांसाठी संजय राऊत (Sanjay Raut) आदर्श आहेत.
ते न घाबरता ईडीच्या कारवाईला सामोरे जातात.
घाबरलेली लोक ब्लॅकमेलर लोकं, ईडीच्या कारवाईला भीऊन पळालेली माणसं, यांचा हिंदूत्वाशी (Hindutva) काही संबंध नाही.
त्यांचा भगव्याशी देखील काही संबंध नाही. त्यांचा निष्ठेशी ही काही संबंध नाही, हे सर्व जण गद्दारच आहेत.

 

Web Title : –  Shivsena | disgruntled cm eknath shinde groups mla in contact with shiv sena again arvind sawant spoke clearly

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News