Shivsena Eknath Shinde group | आगामी पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट भाजपसोबत

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवड ऑटो क्लस्टर येथे शिवसेनेच्या शिंदे गटाचा (Shivsena Eknath Shinde group) पदाधिकारी नियुक्ती मेळावा बुधवारी झाला. त्यावेळी या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. श्रीरंग बारणे यांनी आगामी निवडणूक भाजपबरोबर युती करून लढली जाणार आहे, अशी माहिती दिली आहे. ‘आगामी महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेने (Shivsena Eknath Shinde group) भाजपबरोबर राहण्याचे धोरण ठरवले आहे. त्यामुळे कोणाविरोधात मनात राग न ठेवता काम करीत राहा, महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा,’ असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले आहे.

 

बारणे म्हणाले, ‘निवडणुका येत-जात राहतात. मात्र, पक्षप्रमुखांची ताकद नेत्यांना मिळाली पाहिजे. त्याशिवाय सामान्यांची कामे होणार नाहीत. ती ताकद यापूर्वी मिळाली नाही. पण, कोणाबाबत द्वेष, राग नाही. आता बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची युती आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक म्हणून काम करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात शिवसेनेने पूर्वीपासून संघर्ष केला. लोकसभा, विधानसभा निवडणूक भाजपसोबत युतीत लढलो. नागरिकांनी एकभावनेने मतदान केले, परंतु लोकांची भावना सोडून राष्ट्रवादीसोबत काम करावे लागले. हे मान्य नव्हते. हीच बाब पक्षप्रमुख यांच्या निदर्शनास आणून दिली, परंतु दखल घेतली नाही. त्यामुळे उद्रेक झाला. फूट पडली.’

‘आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढायच्या आहेत.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमवेत समन्वयाने काम करावे. भाजपसोबत धोरण ठरले आहे.
राज्य सरकारच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न सोडविले जातील,’ असेही ते म्हणाले.

 

Web Title :- Shivsena Eknath Shinde group | balasahebs shiv sena group with bjp in the pimpri chinchwad municipal elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indian Railway | रात्री दहानंतर रेल्वेत आवाज केल्यास गाडीतून उतरावे लागेल

CitiusTech Expands Footprint | सिटीअसटेकने पुण्यात नवीन सुविधांद्वारे केला फूटप्रिंटचा विस्तार

Mohit Kamboj Target Sushma Andhare | ‘सुषमा अंधारे संजय राऊतांचे फीमेल व्हर्जन’ – मोहीत कंबोज