मुंबई: Shivsena Eknath Shinde On Shivsena UBT | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नुकताच तीन दिवसीय दिल्ली दौरा केला. मात्र या दौऱ्यावरून आता उलट-सुलट चर्चा सुरु झालेली आहे. उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौरा निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी केल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाने केला आहे. (Shivsena Eknath Shinde On Shivsena UBT)
ठाकरेंनी निवडणुकीच्या फंडासाठी अब्जावधी घोटाळ्याचा आरोप असलेल्या गुप्ता बंधूंची भेट घेतल्याचा आरोप शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे. म्हस्के यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी म्हस्के म्हणाले, ” उद्धव ठाकरे सहकुटुंब लोटांगण दौरा पार पडला. मला मुख्यमंत्री करा, असा कटोरा घेऊन ते दिल्लीत आले होते. पण काँग्रेसने त्यांना अजिबात भाव दिला नाही. संजय राऊत यांनी स्वतःचं राजकीय महत्व वाढवणे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मी कसं नाचवू शकतो हे दाखवणारा हा दौरा होता.
निवडणुकीत फंड गोळा करण्यासाठी हा दौरा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत अब्जावधींचा घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधू यांची भेट घडवून आणणारा हा दौरा होता. ते काही महिन्यापूर्वी जामिनावर बाहेर आले होते”, असे म्हस्के म्हणाले.
” सरकारला कळू नये यासाठी हा दिल्ली दौरा असेल. राऊतांनी ही भेट घडवून आणली.
ही भेट कशासाठी झाली, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. ज्या माणसाने एका देशाला फसवलं, त्याची भेट का घेतली? त्यांच्या घरातील सीसीटीव्ही बंद केले असतील, तर रस्त्यावरील सीसीटीव्ही किंवा त्यांचे फोन तपासा”, असा आरोप म्हस्के यांनी केला.
आफ्रिकन देशाच्या मालकीच्या सरकारी उद्योगांमधून अब्जावधींची लूट केल्याचा गुप्ता बंधूंवर आरोप आहे.
या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. अतुल गुप्ता (Atul Gupta), अजय गुप्ता (Ajay Gupta)
आणि राजेश गुप्ता (Rajesh Gupta) यांच्यावर माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी जवळीक साधली.
त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत अब्जावधी रँड्सचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
जेकब झुमा २०१८ मध्ये अध्यक्षपदावरून पायउतार झाले. त्यानंतर तिघे आणि त्यांचे कुटुंबीय दुबईला पळून गेले होते.
तिथे तिघांना अटक झाली होती.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा