Shivsena | एकीकडे संजय राऊतांना ED कडून दणका तर दुसरीकडे आनंद दिघेंच्या पुतण्यावर मोठी जबाबदारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत (Shivsena) बंडखोरी केल्यापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सातत्याने धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांच्या नावाचा उल्लेख करत आहेत. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचे शिंदे सांगत आहेत. मी मुलाखत दिली तर भूकंप यईल. आनंद दिघे यांच्यासोबत काय घडले हेही सांगेन, असे शिंदे म्हणाले होते. अशातच ठाण्यातील बालेकिल्ला वाचवण्यासाठी शिवसेनेने (Shivsena) मोठी खेळी खेळली आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आगामी काळात दिघे विरुद्ध शिंदे असा सामना रंगताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut ) यांना ईडीने (ED) पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात (Patra Chawl Land Scam Case) ताब्यात घेतले आहे.
ईडीचे 8-10 अधिकारी आज सकाळी सातच्या सुमारास राऊत यांच्या घरी पोहोचले.
राऊत यांची तब्बल 9 तास चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणण्यात आले.
त्यांना आता लवकरच अटक केली जाण्याची शक्यता आहे.
पण मी झुकणार नाही, मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक असल्याचे सांगत राऊत ईडी कार्यालयात दाखल झाले.
या सर्व घडामोडीत शिवसेनेने केदार दिघेंवर मोठी जबाबदारी सोपवली.

एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे (Shivsena) ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के (Thane District Chief Naresh Mhaske) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
या राजीनाम्यानंतर आज ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची शिवसेनेकडून नियुक्ती करण्यात आली.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
यात अनिता बिर्जे (Anita Birje) यांना शिवसेना उपनेते पद देण्यात आले आहे.
केदार दिघे यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना ओवळा, माजीवाडा,
कोपरी पाचपाखाडी हे कार्यक्षेत्र असेल असे स्पष्ट करण्यात आले.
तसेच प्रदीप शिंदे (Pradeep Shinde) यांना ठाणे शहरप्रमुख तर चिंतामणी कारखानीस (Chintamani Karkhanis) यांना ठाण्याचे विभागीय प्रवक्तेपद देण्यात आले आहे.

 

Web Title : – Shivsena | former cm uddhav thackeray has appointed dharmaveer anand dighes nephew kedar dighe as shiv sena thane district chief

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा