मुख्यमंत्री कोण ‘हा’ विषय गौण, योग्यवेळी जाहीर करू : CM देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आम्हाला खुर्ची, पदांकरिता सत्ता नको आहे. मंत्री कोण ? मुख्यमंत्री कोण ? याची चर्चा मिडीयाला करू द्या. मुख्यमंत्री कोण हा विषय आमच्यासाठी गौण विषय आहे. आम्ही सगळं ठरवलेलं आहे. योग्यवेळी निर्णय जाहीर करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणूकीत लोकसभेप्रमाणेच शिवसेना-भाजप युतीला अभुतपुर्व विजय मिळेल असा दावा करत त्यांनी शिवसेना भाजप युती ही वाघ-सिंहाची जोडी आहे. वाघ-सिंह एकत्र येतात तेव्हा जंगलात कोणचे राज्य येणार हे सांगायची गरज नाही. जनता वाघ सिंह एकत्र आल्यावर कौल कोणाला देणार हे स्पष्ट होते. असे मुख्यमंत्री म्हणाले.

बाळासाहेबांचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो
शिवसेनेच्या मेळाव्याला जाताना मला माझ्या घरी येतो असे वाटते, मी येथे आलो आहे तो दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे. त्यांच्यासोबतच शिवसैनिकांची उर्जा घेण्यासाठी आलो आहे. उद्धव ठाकरे हे माझे मोठे बंधू आहेत. त्यांनी शिवसेनेला समर्थ नेतृत्व दिले आहे. असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले आहे.

सिने जगत –

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,