अहमदनगर : दहा दिवसात मार्केटचे गेट खुले करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने गेट उघडणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील मार्केट यार्ड चौकातील दाना मार्केटचे दोन्ही गेट गेल्या अनेक वर्षानपासून उघडे होते. पण आता एक गेट बंद केल्यामुळे व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना त्याचा विनाकारण त्रास होत आहे. या गंभीर प्रश्नांची समितीने दखल घेऊन मार्केटचे बंद गेट दहा दिवसात खुले करावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने गेट उघडणार, असा इशारा शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी आज दिला आहे.

मार्केट यार्ड चौकातील दाना मार्केटचे एक गेट बंद केल्यामुळे व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना त्याचा विनाकारण त्रास होत आहे. या गंभीर प्रश्नाची समितीने तत्काळ दखल घ्यावी याबाबत समितीचे सदस्य परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्याची शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी मंगळवारी दुपारी चर्चा केली.यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते,वसंत कापरे, गिरीष जाधव, मनिष गुगळे, भालचंद्र भाकरे, सुमित कुलकर्णी, पप्पू भाले, सचिन धेंड, अक्षय नागापुरे उपस्थित होते.

राठोड म्हणाले की, समितीने हा निर्णय घेताना त्याबद्दल संपूर्णपणे पाहणी करण्याची गरज होती. स्थानिक व्यापारी यांच्याशी चर्चा करण्याची गरज होती. हा निर्णय नागरिकांच्या हिताचा आहे की नाही, हे पाहून मग घेतला पाहिजे. नागरिकांना त्रास होईल, असे निर्णय काय उपयोगाचे ? आपण तत्काळ याबाबत बैठक घ्या आणि घेतलेला चुकीचा निर्णय बदलून मार्केटचे बंद गेट खुले करा, अन्यथा स्टाईलने गेट उघडणार, असा इशारा दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –