शिवसेनेची कोंडी ! भाजपशी ‘फारकत’ घेतल्यानंतर नव्या समीकरणात ‘व्यत्यय’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अद्याप काही सुटलेला नाही. रोज सत्ता स्थानेबाबतची नवीन समीकरणे पुढे येत आहेत आणि नव्या नव्या वक्तव्यांमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. भाजपने जे ठरलय ते करावं असं म्हणत शिवसेनेने मुख्यमंत्री पदाची मागणी केली. त्यानंतर मात्र शिवसेनेला भाजप सोबत काडीमोड घ्यावा लागला.

राज्यपणालानी आधी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावले मात्र आमच्याकडे पुरेशा जागा नाहीत म्हणून भाजपने सत्ता स्थापनेपासून फारकत घेतली. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी बोलावले मात्र शिवसेनेने आम्हाला पुरेसे संख्याबळ दाखवण्यासाठी मुदत वाढून हवे असल्याचे सांगितले मात्र राज्यपालांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर राष्ट्रवादीने देखील सत्ता स्थापनेसाठी नकार दिल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

यानंतर संजय राऊत यांनी वारंवार भाजपवर निशाणा साधला आणि वारंवार टीका देखील केली. राऊत यांनी आमच्याकडे 170 आमदारांचा पाठींबा असल्याचे देखील सांगितले आणि त्यानंतर शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जवळीक वाढत गेली. राज्यात महाशिवआघाडी बाबतची बोलणी सुरु असताना शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ता स्थापनेबाबत पवारांना विचारले असता शरद पवार म्हणाले, याबाबत शिवसेनेला विचारा. तसेच सेनेला पाठींबा देण्याबाबत काँग्रेससोबत बैठक असल्याचे देखील मला माहित नाही असे पवार म्हणाले त्यामुळे मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

एवढे दिवस काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरु आहे, असे म्हणणाऱ्या शिवसेनेची मात्र यामुळे चांगलीच कोंडी झाली आहे. एवढेच नाही तर सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरु आहे का असे पवारांना विचारले असता, कसली चर्चा, कोणाशी चर्चा अशा शरद पवारांच्या उत्तराने सर्वच गोंधळात पडलेले आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार स्थापन होणार अशी चर्चा आहे. असे असताना पवारांनी मात्र असे काही सुरुच नसल्याचे म्हटले आहे. शिवसेना-भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवली आहे. ते वेगळे आहेत आणि आम्ही व काँग्रेस वेगळे आहोत. त्यांनी त्यांचा मार्ग निवडायचा आम्ही आमचे राजकारण करू, असे पवार म्हणाले.

भाजपसोबत काडीमोड घेतल्यामुळे आणि पवारांकडून असे वक्तव्य करण्यात आल्यामुळे शिवसेनेची पूर्ती कोंडी झाली आहे. केंद्रीय मंत्री पदाचा शिवसेनेने राजीनामा दिलेला आहे आणि राज्यातही सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नाही. त्यामुळे नेमकं सेनेच्या हाती काय लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यातच भाजपसोबत काडीमोड घेतल्या नंतर नवीन संसाराची सुरुवात सेना कशा पद्धतीने करेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Visit : Policenama.com