शिवसेनेचं हिंदुत्व ‘धर्मनिरपेक्ष’ तर भाजपचं ‘मनुवादी’ : जोगेंद्र कवाडे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी भाजपचे हिंदुत्व हे मनुवादी आहे तर शिवसेनेचे हिंदुत्व हे धर्मनिरपेक्ष आहे असे मत व्यक्त केले आहे. कवाडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त औरंगाबाद येथे आले होते. तेव्हा तेथील एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपले मत मांडले आहे.

विधानसभा निवडणुका झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली आणि या एकत्र येण्याने अनेकांना धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी सांगितले की, भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष जरी हिंदुत्ववादी असतील तरी त्या दोघांचा हिंदुत्ववाद हा वेगवेगळा आहे. भाजपाचे हिंदुत्व हे मनुवादी असून शिवसेनेचे हिंदुत्व हे भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे आहे. कारण भाजपाचे मनुवादी हिंदुत्व हे समानता आणि धर्मनिरपेक्षता या मुल्यांना नाकारते. तर शिवसेनेच्या हिंदुत्वात धर्मनिपेक्षता आहे. त्यामुळे ते भाजपापेक्षा वेगळे ठरते. तसेच शिवसेनेकडे प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा देखील आहे.

तसेच कवाडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबाबत प्रश्न केला असता ते म्हणाले की, हे आघाडीचे सरकार असून मित्रपक्षांना सन्मानपूर्वक वाटा मिळेल अशी अपेक्षा होती पण ती पूर्ण न झाल्याने कार्यकर्त्यांची नाराजी झाली. असे असले तरी काही काळाने विस्तार होईल, त्यामुळे आशा जिवंत आहे, असे सुचक विधानही त्यांनी केले.

‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर बोलताना त्यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेत तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच शरद पवार यांना जाणता राजा म्हटलं तर कसं चालतं? असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता प्रा. कवाडे यांनी थेट उत्तर न देता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी खूप कामे केलेली आहेत त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणतात असे नमूद केले.

फेसबुक पेज लाईक करा –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like