Shivsena | ‘उद्धव काकांनी संधी दिली तर राजकारणात येईन’, बाळासाहेबांचा आणखी एक नातू राजकारणात येण्याच्या तयारीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच शिंदे गटाने शिवसेना (Shivsena) आणि धनुष्यबाण चिन्हावर (Dhanushyaban Symbol) दावा केल्याने हा वाद आणखीनच तीव्र झाला असल्याचे दसरा मेळाव्यावरुन (Dasara Melava) स्पष्ट होते. दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर घाणाघाती टीका केली.

 

शिंदे गटाच्या (Shinde Group) दसरा मेळाव्याला जयदेव ठाकरे (Jaidev Thackeray), स्मिता ठाकरे (Smita Thackeray), निहार ठाकरे (Nihar Thackeray) हे उपस्थित होते. तर ठाकरे गटाच्या मेळाव्यात जयदेव ठाकरे यांचे पुत्र आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे मोठे नातू जयदीप ठाकरे (Jaideep Thackeray) उपस्थित होते. यावरुन ठाकरे कुटुंबात दुरावा वाढल्याची चर्चा सरु झाली आहे. दरम्यान, जयदेव ठाकरे यांचे पुत्र जयदीप ठाकरे यांनी एका मराठी वृत्तवाहीनीशी संवाद साधला.

 

यावेळी बोलताना जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी दिली तर पक्षासाठी काम करीन, असे सांगितले. ते म्हणाले, मी बळासाहेबांचा मोठा नातू, या नात्याने जबाबदारी पार पाडत आहे. खरी शिवसेना कोणाची हे सर्वांना माहित आहे. शिवसेनेत (Shivsena) दोन गट पडतील, असे कधीच वाटले नव्हते. कोरोना काळात काका स्वत: आजारी असताना त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे, असे म्हणत जयदीप यांनी उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतुक केले.

जयदीप ठाकरे पुढे म्हणाले, मी आतापर्यंत दसरा मेळाव्याबाबत ऐकत होतो,
मात्र यंदा मी गेलो आणि अनुभव घेतला. उद्धव काकांनी संधी दिली तर मी नक्की राजकारणात येईन.
बाकी कुटंब कोणाला पाठिंबा देतंय याबाबत मला बोलायचं नाही.
मी बाळासाहेबांचा मोठा नातू म्हणून उद्धव काकांच्या दसरा मेळाव्यात गेलो होतो.
मोठा नातू म्हणून मी जबाबदारी पार पाडत आहे, असेही जयदीप यांनी सांगितले.

दरम्यान, सध्याचे राजकीय वातावरण पाहता राज्याच्या राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री होणार का?
अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

 

Web Title :- Shivsena | i will work for the party if uddhav thackeray gives responsibility jaydeep thackeray entry in politics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा