…’त्या’ दिवशी शिवसेनेचा विषय संपेल, पण नितेशची साथ मरेपर्यंत सोडणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नितेश राणे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत सकारात्मक मत व्यक्त केलं होतं. त्याला माजी खासदार निलेश राणे यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे नारायण राणे यांच्या पुत्रांमध्ये शिवसेनेच्या मुद्द्यावरुन मतभेद आहेत अशी चर्चा सुरु झाली होती. त्यावर आता निलेश राणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की , ‘कालच्या माझ्या ट्विटचा मीडियाने गैर अर्थ काढला असून नितेशची साथ मी मरे पर्यंत सोडणार नाही. नितेशनी मला जे अधिकार दिले त्यातून मी त्याला समजवले. राहिला विषय शिवसेनेचा, ज्या दिवशी शिवसेना राणे साहेबांची बदनामी आणि त्रास देणे थांबवेल त्यादिवशी शिवसेनेचा आणि माझा विषय संपेल.’

काय म्हणाले होते नितेश राणे
आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळात येण्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार आहे, असं नितेश राणे यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं.

त्यांच्या या भूमिकेला विरोध दर्शवताना निलेश राणे म्हणाले की, ज्या पक्षानी राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरूनच करणार. पण त्यानंतर ज्या दिवशी शिवसेना राणे साहेबांची बदनामी आणि त्रास देणे थांबवेल त्यादिवशी शिवसेनेचा आणि माझा विषय संपेल.

कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. राज्यात भाजपशी युती असताना देखील शिवसेनेने केवळ नितेश राणे यांच्या विरोधात कणकवलीतून अधिकृत उमेदवार उभा केला आहे. नारायण राणे यांची शिवसेनेतून काढून टाकल्यापासून शिवसेना आणि राणे यांच्यात वाद सुरु आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी