मराठा आरक्षणासाठी यशस्वी लढा देणाऱ्या विनोद पाटलांना आदित्य ठाकरेंचे पक्षप्रवेशाचे खुले आवाहन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये आलेले युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी, मराठा आरक्षणासाठी यशस्वी लढा देणाऱ्या विनोद पाटील यांना आपल्या पक्षात प्रवेश करण्याचे खुले आवाहन केले. ठाकरे म्हणाले, विनोद पाटील तुम्ही आमच्या पक्षात सामील व्हा. असे किती दिवस बाहेर राहता ? असे खुले आवाहन युवसेनाप्रमुखांनी केले.

ठाकरेंनी केले पक्षप्रवेशाचे आवाहन
आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने हडकोतील ताठे मंगल कार्यालयात नागरिकांशी संवाद साधणार होते. ठाकरे निवासासाठी प्रसिद्ध रामा इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये थांबले होते. हॉटेल मधून कार्यालयात जाताना वाटेत ते पाटील यांच्या घरी गेले आणि त्यांच्याशी संवाद साधला. सुरवातीला ठाकरे यांच्यासोबत अभिजित देशमुख, अंबादास दानवे, एकनाथ शिंदे सोबत असताना पाटील यांच्याशी पाच-सहा मिनिटे चर्चा केली. त्यानंतर तेथून सर्वांना बाहेर जायला सांगितले. त्यानंतर पाटील व ठाकरे यांनी बंद दरवाजाआड सुमारे २५ मिनिटे चर्चा केली. सध्या राज्यात विधानसभेचा माहोल आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा चांगल्याच रंगू लागल्या आहेत. त्यात ठाकरे – पाटील यांच्या भेटीमुळे सगळीकडे विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.

विनोद पाटील काय म्हणाले
ज्यांनी मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन पद्धतीने अतिशय यशस्वी लढा दिला ते विनोद पाटील म्हणाले, असं एकदम कुठलाही निर्णय घेता येत नाही. आपण ठेवलेल्या प्रस्तावावर सविस्तर विचार करून मी आपल्याला निर्णय कळवतो असे पाटील म्हणाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे असेही समजले कि, या दोघांमध्ये मोफत शिक्षण या विषयावर सुद्धा चर्चा झाल्याचे समजते. यामुळे येत काळात विविध चर्चांना आणखी उधाण येणार आ.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like