शिवसेनेच्या अनंत गितेंचा सुनील तटकरेंबाबत धक्कादायक ‘गौप्यस्फोट’

गुहागर : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते अनंत गिते यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. खासदार सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेत घेण्यासाठी अनेकदा विनंती केली होती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री अनंत गिते यांनी केला आहे. सुनील तटकरे यांनी मला पक्षात घेतले नाही तरी चालेल, पण माझी मुलगी आदितीला पक्षात घेऊन तिला तिकीट द्या अशी विनंती सुनील तटकरेंनी उद्धव ठाकरे यांना केल्याचे गिते यांनी सांगितले.

आनंद गिते हे गुहागरमधील प्रचार सभेच्या दरम्यान त्यांनी गौप्यस्फोट केला. गिते यांच्या गौप्यस्फोटामुळे गुहागरमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक सुनील तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र, तटकरे यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत आपण राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

सुनील तटकरे यांनी आपण राष्ट्रवादी सोडून इतर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे जाहीर करून त्यांच्या बाबत पक्ष बदलाच्या सुरु असलेल्या चर्चांना पूर्ण विराम दिला. यावेळी सुनील तटकरे म्हणाले होते, माझ्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्या खोट्या आहेत. मी राष्ट्रवादी सोडणार नाही. यापुढेही मी कायम शरद पवार यांच्यासोबत राहणार आहे, असे म्हणत सुनील तटकरे यांनी शिवसेना प्रवेशाच्या चर्चा निरर्थक असल्याचे म्हटले होते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी