शिवसेना शहर प्रमुखासह ‘या’ नेत्यांना अटक

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – शिवजयंतीच्या काळात शहरातून हद्दपार असतानाही मिरवणूकीत सहभागी झालेले शिवसेना नगर शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम या शिवसेनेच्या शहरातील नेत्यांसह काही समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप निटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शिवजयंतीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी सुमारे चारशेहून अधिक समाजकंटकांना नगर शहरातून दोन दिवसांसाठी हद्दपार केले होते. मात्र, तरीही आज शिवजयंतीच्या मिरवणुकीत शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, विशाल वालकर यांच्यासह सहभागी झाले होते. त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच इतरींनाही ताब्यात घेतले आहे.

शिवसेनेच्या शहरातील नेतेमंडळींना पोलिसांनी अटक केल्यानंतर कार्यकर्त्यांनी मिरवणूक आटोपती घेतली. त्यामुळे ९ वाजताच मिरवणूक संपली. सदर घटनेनंतर शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांच्या कार्यालयाभोवती कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us