विधान परिषदेच्या उपसभापतिपदासाठी आज निवडणूक, शिवसेनेला मिळणार पद ?

मुंबई : वृत्तसंस्था – मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला दोन कॅबिनेट मंत्रीपदे दिल्यानंतर आता भाजप विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला खुश ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. आता विधानपरिषदेच्या उपसभापतिपदासाठी आज मतदान पार पडणार आहे. सध्या उपसभापती पद हे रिक्त असून या पदावर निवडणूक व्हावी यासाठी भाजपा आणि शिवसेना आग्रही आहे. जर या पदासाठी निवडणूक घेण्याचा निर्णय झाला तर हे पद शिवसेनेच्या वाट्याला जाऊ शकते किंबहुना भाजप त्यांना हि जागा सोडू शकतो असे बोलले जात होते.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर या निवडणुकीची घोषणा करतील. त्यानंतर कामकाज होईपर्यंत निवडणुकीचा सोपस्कार पार पाडला जाणार आहे. हि निवडणूक बिनविरोध पार पडणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेकडून आमदार नीलम गोऱ्हे यांचं नाव या पदासाठी आघाडीवर असल्याचे समजत आहे. मात्र याचदरम्यान, शिवसेना आणि भाजप विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रामराजे शिवसेनेत जाणार अशा चर्चा रंगू लागल्या असताना त्यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, मंगळवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना सभापतींनी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात दुजाभाव केल्याचा आरोप करत त्यांच्यावर अविश्वास ठराव दखल करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजच्या निवडणुकीत त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला जातो कि नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

दुधी भोपळ्याची भाजी खाल्ल्यास दूर पळतील अनेक आजार

प्राचीन ग्रंथांमध्ये सूखी वैवाहिक जीवनासाठी सेक्ससंबंधी शास्त्रीय माहिती

तेजस्वी डोळ्यांसाठी गुणकारी औषधी वनस्पतींचा वापर

डोकेदुखीची वेदना एक…परंतु, कारणे असू शकतात वेगवेगळी