पंकजा मुंडेंच्या पक्ष बदलण्याच्या चर्चेबद्दल नीलम गोर्‍हेंनी केलं ‘हे’ महत्वाचं वक्तव्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशी चर्चा जोर धरू लागली होती. विधानसभेत पक्षाकडूनच कुरघोडी करून पंकजा यांचा पराभव केला गेला म्हणून त्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी एक जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी याबाबत महत्वाचे विधान केले आहे.

नीलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे सोबत आमचे राजकारणापलीकडचे संबंध आहेत आणि मुंडे कुटुंबासोबत आधीपासून वेगळा संवाद राहिलेला आहे. १२ डिसेंबरला अजून ९ दिवस बाकी आहेत तोपर्यंत ‘वेट अँड वॉच’, अशा प्रकारचे वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

शिवसेनेकडून शरद पवारांचे कौतुक
आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही, सत्तेसाठी गलिच्छ राजकारण करत नाही. उद्धव ठाकरे हेच पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री म्हणून राहतील. शरद पवार यांची वडीलकीची भूमिका आहे, असे रोखठोक मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे. दगडूशेठ हलवाई गणपती, कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरीचे दर्शन घेतल्यानंतर नीलम गोऱ्हे प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.

काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे यावेळी
हे सरकार दाऊदला सुद्धा क्लीन चिट देईल यावर गोऱ्हे म्हणाल्या, दाऊदला परत आणण्याचा विषय हा केंद्र सरकारचा आहे त्यासाठी राज्य सरकार पूर्ण मदत करेल.

बुलेट ट्रेन किंवा नाणार सारख्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा रोजगार हिरावून घेतला जात असेल आणि लोकांचा याला विरोध असेल तर आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे आता पुण्याच्या टेकड्या नक्की वाचतील असे देखील गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

Visit : policenama.com