शिवसेना आमदार राहुल पाटील यांनी केला मनपा आयुक्तांना गढूळ पाणी पाजण्याचा प्रयत्न 

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन 

ऋषिकेश करभाजन 

शहरातील रस्त्यांची दुरावस्था, नळ कनेक्शन द्वारे गढूळ पाणी, अशा अनेक महानगर पालिकेच्या गलथन कारभाराचा निषेध म्हणून शिवसेना आमदार राहुल पाटील यांनी मनपा आयुक्तांना चक्क गढूळ पाणी पाजण्याचा प्रयत्न केला.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’48424219-aabe-11e8-b82d-3bb92de98420′]

या बाबत मिळालेली अधीक माहिती अशी की, शहरातील रस्त्यांवर असलेले खड्डे, त्यात साचलेले गढूळ पाणी, तसेच मनपा नळ कनेक्शन द्वारे होणाऱ्या गढूळ पाणी पुरवठा, अशा अनेक समस्यांचे  निवेदन वारंवार मनपा आयुक्तांना दिले असता, त्यावर कुठल्याही प्रकारचा निकष निघत नव्हता, मनपाच्या या गलथन कारभारच्या निषेधार्त शिवसेना आमदार राहुल पाटील यांनी आयुक्तांना गढूळ पाणी पाजण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या सर्व गोष्टी सुधारण्यासाठी मनपा आयुक्तांना  पुढील १५ दिवसांची मुदतही दिली आहे.

खड्ड्यांत लावले बेशरमाचे झाड , खड्ड्यात केला यज्ञ

 खर तर मराठवाड्यात बेशरमाचे झाड हे एखाद्या अमान्य कृत्या साठी दिलेली उपमा आहे. खरे तर मनपाचा गलथन कारभार या बेशरमाच्या झाडा प्रमाणेच आहे असे सांगून संतप्त  शिवसेना आमदार राहुल पाटील आणि कार्यकर्त्यांनी चक्क शहरातील विविध भागात रस्त्यांवर पडलेल्या खड्यात बेशरमाचे झाड लावून तीव्र  निषेध व्यक्त केला. इतकेच नव्हे तर, रस्त्यांमध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये बसून यज्ञही केला.

आता  शिवसेनेच्या या तीव्र निषेधार्थ मनपा काय पाऊल उचलेते  याकडे परभणीकरांचे लक्ष लागले आहे.