भाजपच्या सत्तास्थापनेसाठी राणेंचा प्रयत्न, संजय राऊत म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर फॉर्म्यूल्याची चिंता करु नये. राज्याच्या हितासाठी आघाडीकडून एकसूत्री कार्यक्रम देणार आहोत. राज्यात शिवसेनेच्याच नेतृत्वात सरकार बनणार आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. त्यावेळी त्यांनी भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणेंबद्दलही भाष्य ही केले. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील संभाव्य आघाडीच्या चर्चेबद्दल माहिती देखील दिली.

संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी सरकार स्थापन करावे. त्यांना माझ्या शुभेच्छा’. मात्र, भाजपच्या सत्तास्थापनेसाठी नारायण राणे नेमक्या कोणत्या पक्षाचे आमदार भाजपकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करत आहे हे अद्याप कळाले नाही.

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळून देखील सत्तेपासून त्यांना दूर रहावे लागत आहे. यामध्ये भाजपाच्या सत्तास्थापनेसाठी नारायण राणे यांनी एन्ट्री केली होती. ते भाजप सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार आहे. राणे यांनी स्पष्ट सांगितले की, ‘देवेंद्र फडणवीस यांची मी भेट घेतली असून, त्यांनी मला आपण सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर सत्ता स्थापनेसाठी जे काही करावे लागेल ते आपण केले पाहिजे. यासाठी माझ्याकडून जे काही करता येईल ते मी नक्की करेन. त्याचबरोबर फडणवीस यांनी सरकार स्थापन करण्यासाठी कामाला लागा, असे देखील मला सांगितले आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली खूप दुःखाची गोष्ट आहे. आम्ही जेव्हा राज्यपालांकडे जाऊ तेव्हा रिकाम्या हाताने जाणार नाही. आमच्याकडे १४५ बहुमत असेल, असा दावा देखील राणे यांनी केला आहे.

Visit : Policenama.com