सातार्‍यात उदयनराजेंना साथ देण्याच्या प्रश्‍नावरून शिवसेनेची ‘ही’ भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साताऱ्याच्या लोकसभा पोटनुवडणुकीला घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. आता ही पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत होणार आहे हे स्पष्ट झालं आहे. अखेर सातारा पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. भाजपच्या तिकीटावर उदयनराजे पोटनिवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे शिवसेना त्यांना पाठिबा देणार की नाही यावर आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, “सातारा लोकसभेच्या विद्यामान खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता ताणतणाव कशासाठी करायचा. नंतर पाहूयात. 2024च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा जागांचं वाटप होईल. तेव्हा साताऱ्याच्या बदल्यात काय घेता येईल पाहूयात. आधी उदयनराजेंना निवडणूक लढवूद्यात. त्यांना जिंकून येऊद्यात. त्यानंतरचा निकाल आहे तो. सध्या निवडणूक होऊद्यात. ही युती आहे युतीमध्ये काय भूमिका असणार” असं म्हणत संजय राऊत यांनी पोटनिवडणुकीत उदयनराजेंना समर्थन देणार असल्याचं स्पष्ट केलं.

भाजपच्या तिकीटावर लढणाऱ्या उदयनराजेंना शिवसेना पाठिंबा देणार का अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत होती. याबाबत आता संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे.