… तर तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण करण्यास नालायक आहात : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र महाराष्ट्रातून गुजरातला जाणं हा कुणाला महाराष्ट्रावरील अन्याय वाटत नसेल आणि त्यासाठी तुम्ही जर आवाज उठवत नसाल तर महाराष्ट्राचं राजकारण करण्यास तुम्ही नालायक आहात, असा हल्ला करतानाच महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचं पाहून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आत्मा तळमळला कसा नाही ? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत बोलत होते.

विरोधीपक्षावर राऊतांचा जोरदार हल्ला
आयएफएससी केंद्र गुजरातला हलविण्याच्या निर्णयावर केंद्र सरकारसह महाराष्ट्रातील विरोधी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. आयएफएससी केंद्र गुजरातला हलविण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक आहे. त्याहीपेक्षा महाराष्ट्रातील विरोधी पक्ष महाराष्ट्राऐवजी गुजरातची बाजू घेतो हे धक्कादायक आहे. आमचं सरकार आज राज्यात सत्तेत असलं म्हणून काय झालं ? ते वित्तीय केंद्र गुजरातला गेलंच कसं असा सवाल करत विरोधी पक्षाने राज्य सरकारला धारेवर धरायला हवं होतं. ही त्यांच्यासाठी संधी होती. पण महाराष्ट्रावर अन्याय होत असताना गुजरातची बाजू घेणारा हा इतिहासातील पहिला विरोधी पक्ष असल्याचा टोला त्यांनी लगावला.

तर तुमची लायकी नाही…
यापूर्वी काय झालं… नंतर काय झालं.. खड्ड्यात गेलं ते. तुमचा वकिली बाणा काहीही असेल. पण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि अधिकाराचा प्रश्न आहे. तरीही तुम्ही गुजरातची बाजू घेत असला तर तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण करण्याच्या लाकयकीचे नाहीत, अशी टीका राऊत यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर केंद्रात आहेत. त्यांनी बोलायला पाहिजे होतं अस मत त्यांनी व्यक्त केलं.