‘गांधींवर टीका करताना गोडसेची सभ्यता स्वीकारा’ : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महात्मा गांधी यांना मारणाऱ्या नथुराम गोडसे याच्या विरोधात बोलले जात असतानाच शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. महात्मा गांधी यांच्या तोडीचा नेता स्वतंत्र्य चळवळीत झाला नाही. त्यांचे हे मोठे पण मान्य करूनच नथुराम गोडसे याने गांधीच्या पायाला स्पर्श करून मग गोळ्या झाडल्या, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.

नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांच्यावर गोळी झाडताना त्यांच्या पायाला स्पर्श केला. त्यानंतर गोळ्या झाडल्या. गोडसेच्या प्रेमींनी गांधीजवर टीका करताना गोडसेची ही सभ्यता स्वीकारायला हवी असा उपरोधक सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच भाजप नेत्यांनाही सल्ला दिला दिला आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात लिहलेल्या लेखामध्ये संजय राऊत यांनी गांधीजींच्या बदनामीवर भाष्य केले आहे.

भाजपशी संबंधीत अनंतकुमार हेगडे, साध्वी प्रज्ञा सिंह अशा लोकांकडून गांधीजीबद्दल सातत्याने उलसुलट वक्तव्य केली जात आहेत. यावर संजय राऊत यांनी म्हटले आहे की, गांधीजी यांच्यामुळे पाकिस्तान झाला, असं ज्यांना वाटतं त्यांनी पक्षाच्या बैठकीत मोदी व शहांकडं पाकिस्तान पुन्हा जिंकून घेण्याची मागणी करायला हवी. हे साहस कुणात आहे का ? गांधीजी यांच्यावर गोळ्या झाडणं, त्यांच्या हेतूवर शंका घेणं पापच आहे. पण हेगडे आणि पज्ञा यांना हे पाप करण्याचे स्वातंत्र्य व अधिकार गांधींमुळेच मिळाले, हे लक्षात घतले पाहिजे. महात्मा गांधींना समजू घणं हेगडेवारांसाख्यांना शक्य नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.