“खोटी दाढी-मिशी लावून आम्हाला ‘शिवाजी महाराज-संभाजी महाराज’ सांगायचं काम करू नये”

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. त्यात प्रचारासाठी प्रत्येक पक्षांनी कंबर कसली आहे. शिरुरमधून लोकसभेला राष्ट्रवादीने अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली आहे. अमोल कोल्हे हे त्यांच्या शिवाजी महाराज, आणि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकांमधून घराघरांत पोहोचले आहेत. त्यामुळे तेथील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार शिवाजी आढाळराव पाटील यांनीही या विषयाला हात घातला आहे. शिवजन्मभूमी शिवनेरी गड ते शंभूराजांच्या स्मृतिस्थळी म्हणजेच वढू तुळापूर अशी रॅली त्यांनी काढली आहे. त्यावेळी आढाळराव पाटील आणि शिवसेनेत प्रवेश केलेले शरद सोनवणे अमोल कोल्हेंवर टीका कोली आहे.

खोटी दाढी-मिशी लावून आम्हाला शिवाजी महाराज, संभाजी महाराज सांगायचं काम करू नये, असं शरद सोनवणे यांनी म्हटलं. तर आढाळराव पाटलांनीही अमोल कोल्हेंवर निशाणा साधला. मी निधड्या छातीचा मराठा आहे. मी शिवरायांचा पाईक आहे. तेव्हा मला कुणी आव्हान देऊ नये, असं म्हणत त्यांनी आपला मराठीबाणा दाखून दिला. दरम्यान, अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करतानाच म्हटलं होतं की त्यांच्या मालिकांवरून राजकारण करू नये. तरीही त्यावर शिवसेनेनं टीका केली आहे. त्यामुळे आता अमोल कोल्हे काय भूमिका घेतात ते पाहणे महत्त्वाचे आहे.