…म्हणुनच माझा पराभव झाला ; शिवाजीराव आढळराव पाटलांकडून पराभवाचं विश्‍लेषण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दुर्देवाने मला अपयश आले. शिरूर मतदार संघात राष्ट्रवादीचं काहीएक कर्तृत्व नाही. काही लोकांनी प्रचारादरम्यान जातीचे राजकारण केले आणि मतदारांनी भावनिक होत संभाजी महाराजांच्या भूमिकेला मतदान केले, असे पराभवाचे विश्‍लेषण करत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.

मी लढणारा कार्यकर्ता आहे, राज्यसभा हा माझा विषय नाही. त्यामुळे संधी मिळाली तरी आपण राज्यसभेवर जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आढळराव पाटील यांचा गेल्या 15 वर्षापासुन नियमित भरणारा जनता दरबार आजही रविवारीच भरला. शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी आढळराव पाटील यांची भेट घेतली. आढळराव पाटील यांनी त्यांचा पराभव मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. चौथ्यांदा निवडून आलो असतो तर शिवसेनेला महत्वाचे मंत्रीपद मिळाले असते. हे मंत्रीपद हुकल्याने मतदार संघातील जनतेला दुःख झाले आहे. माझ्या पराभवाचा वचपा आंबेगावची जनता नक्‍की भरून काढेल असे म्हणत आढळरावांनी थेट दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला. यापुढे देखील जनता दरबार भरला जाईल असेही आढळरावांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

Loading...
You might also like